Baipan Bhaari Deva 2 News: बाईपण भारी देवा सिनेमा सध्या सगळीकडे चांगलाच गाजतोय. बाईपण भारी देवा पाहायला अनेकांनी गर्दी केली.
महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही सिनेमा पहायला प्रेक्षकांनी गर्दी केली. हैद्राबादमध्ये सुद्धा महिलांनी बाईपण भारी देवा पहायला थिएटर हाऊसफुल्ल केलं.
बाईपण भारी देवा ला प्रेक्षकांनी डोक्यावर केलं. अशातच बाईपण भारी देवाची नवी ऑफर प्रेक्षकांसाठी आहे.
ऑफरबद्दल दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात...
हा सिनेमा "तीने" डोक्यावर घेतला. पण खरतर मी तो पुरूषांसाठी सादर केला होता. कारण जोवर तो तीचं मन समजून घेत नाही तोवर काहीच वेगळं घडणार नाही!! आता मात्र तीचा मान सन्मान राखा. या शुक्रवार पासून ही बंपर ॲाफर समस्त पुरूष वर्गाला!! चांगला सिनेमा तुमची थिएटर मध्ये वाट पाहतोय... ११ ऑगस्टपासुन बाईपण भारी देवा कोणत्याही थिएटरमध्ये फक्त १०० रुपयात बघता येईल
बाईपण भारी देवा चा सिक्वेल येणार?
बाईपण भारी देवा सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्ये बाईपण भारी देवा ची कथाकार वैशाली नाईक बाईपण.. साठी काम केलेला लेखक, दिग्दर्शक, पटकथाकार ओंकार दत्त पहायला मिळत आहेत.
"एक कहानी खतम तो दुजी शुरु हो गयी मामू.. बाईपण भारी देवा नंतर.. काहीतरी भारी.." असं कॅप्शन दिलंय. या फोटोला चाहत्यांनी पसंती दिलीय.
बाईपण भारी देवा सिनेमाच्या या टीमला पाहून अनेकांना सिनेमाच्या सिक्वेलची तयारी सुरु झालीय, अशा चर्चा सुरु झाल्यात. बाईपण भारी देवा सिनेमाच
सचिन तेंडुलकर बाईपण भारी देवा पाहून दीपाला लावला व्हिडीओ कॉल
बाईपण भारी देवा सिनेमाचा विशेष शो काल रविवार रात्री रंगला. या शोला सचिन तेंडुलकरसह राज ठाकरे, दिग्दर्शक केदार शिंदे, निर्माते अजित भुरे आणि सिनेमाचे इतर कलाकार उपस्थित होते.
बाईपण भारी देवा सिनेमा पाहिल्यानंतर कोणीतरी दीपा चौधरीला व्हिडीओ कॉल लावला. तेव्हा सचिनने दीपाचं कौतुक केलं. सचिन तिला म्हणाला,"खुप आवडला सिनेमा. अभिनंदन. भेटुया आपण सर्व. अजित माझ्या बाजुलाच आहे. मी त्याला तेच सांगत होतो. All The Best" असं म्हणत सचिनने दीपाचं कौतुक केलं. दीपाला खुप आनंद झाला होता. ती व्हिडीओ कॉलवर सचिनचे आभार मानत होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.