Baipan Bhaari Deva: बाईपण भारी देवा सिनेमा लहानांपासुन मोठ्यांपर्यंत, बायकांपासुन पुरुषांपर्यंत सर्वांना आवडला. बाईपण भारी देवा पाहण्यासाठी अजुनही थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी सुरु आहे.
काहीच दिवसांपुर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी बाईपण भारी देवा सिनेमाचं विशेष स्क्रिनींग आयोजित केलं होतं. अशातच मुंबई पोलिसांसाठी बाईपण भारी देवा सिनेमाचा विशेष शो नुकताच आयोजित करण्यात आला होता.
(baipan bhaari deva special show for mumbai police)
मुंबई पोलिसांसाठी बाईपण भारी देवा चा विशेष शो
"ऑन ड्युटी २४ तास असणाऱ्या मुंबई पोलिसांनी अडीच तास 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा मनापासून आनंद घेतला. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत १०० पोलीस कर्मचारी या खेळाला हजर होते.
चित्रपट पाहिल्यानंतर सगळ्या पुरुषांनी हा सिनेमा पाहायला हवा अशा भरभरून प्रतिक्रिया दिल्या.", अशी प्रतिक्रिया बाईपण भारी देवा सिनेमाचे निर्माते Jio Studios ने दिलीय
पोलिसांनी सिनेमा पाहिल्यावर सुकन्या मोने म्हणतात..
मुंबई पोलिसांकडून बाईपण भारी देवा चित्रपटाचे भरभरुन कौतुक! बाईपण भारी देवा हा चित्रपट रिलीज होवून जवळ जवळ दीड महिना उलटून गेलाय तरी प्रेक्षकांचा उत्साह तसू भरही कमी झालेला नाही.
कुठेतरी सिनेमाची गाणीच गाजतायात तर काहीजण कोणत्या न कोणत्या पात्रात स्वतःला अनुभवत आहे. असं वाटतंय जणू ह्या सिनेमामुळे महाराष्ट्रात एक उत्सवाचं वातावरण निर्माण झालंय....., अशा शब्दात सुकन्या मोनेंनी भावना व्यक्त केल्यात
बाईपण भारी देवा आता फक्त १०० रुपयात
बाईपण भारी देवा सिनेमाची येत्या शुक्रवारपासुन विशेष ऑफर आहे. त्याबद्दल दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात.. "सिनेमा "तीने" डोक्यावर घेतला. पण खरतर मी तो पुरूषांसाठी सादर केला होता. कारण जोवर तो तीचं मन समजून घेत नाही तोवर काहीच वेगळं घडणार नाही!!
आता मात्र तीचा मान सन्मान राखा. या शुक्रवार पासून ही बंपर ॲाफर समस्त पुरूष वर्गाला!! चांगला सिनेमा तुमची थिएटर मध्ये वाट पाहतोय... ११ ऑगस्टपासुन बाईपण भारी देवा कोणत्याही थिएटरमध्ये फक्त १०० रुपयात बघता येईल."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.