‘बळी’ चित्रपटात पूजाचा ग्लॅमरस अंदाज; साकारतेय डॉक्टरची भूमिका

Bali Marathi movie actress pooja Sawant play dashing doctor character post viral social media
Bali Marathi movie actress pooja Sawant play dashing doctor character post viral social media
Updated on

मुंबई -  मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर आणि गुणी अभिनेत्री पूजा सावंत आपल्या चाहत्यांना  पुन्हा एकदा सुखद अनुभव देण्यास तयार झाली आहे.  ‘बळी’ या आपल्या आगामी चित्रपटात ती वेगळी भूमिका साकारते आहे. ‘बळी’या चित्रपटाबद्दल त्यातील अनेक नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी प्रेक्षकांमध्ये उत्कंठा लागली आहे. या चित्रपटामध्ये पूजा डॉक्टरची भूमिका हे या आतुरतेचे आणखी एक कारण आहे. ‘जीसिम्स’ (ग्लोबल स्पोर्ट्स एन्टरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड)च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांची निर्मिती असलेला ‘बळी’ १६ एप्रिल २०२१ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ‘बळी’चे दिग्दर्शन विशाल फुरिया यांचे असून त्यात प्रमुख भूमिकेत मराठीतील सुपरस्टार स्वप्निल जोशी दिसणार आहे.

नाविन्यपूर्ण चित्रपटांसाठी ओळखली जाणारी पूजा सावंत ही एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती पहिल्यांदाच स्वप्निल जोशीबरोबर रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. ‘बळी’ हा पूजाचा विशाल फुरियाबरोबरचा दुसरा चित्रपट आहे. तिने ‘लपाछापी’ या त्याच्या गाजलेल्या व प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी नावाजलेल्या चित्रपटात काम केले होते. निर्माते ‘जीसिम्स’नेपूजाचे पूर्णाकृती छायाचित्र असलेले ‘बळी’चे एक नवे पोस्टर नुकतेच प्रकाशित केले आहे. या पोस्टरमध्ये तिच्या हातात स्टेथोस्कोप आहे आणि त्यावरून या चित्रपटात ती डॉक्टरच्या भूमिकेत आहे, हे ध्यानात येते. अत्यंत आश्वासक अशा तिच्या या लुकवरून प्रेक्षकांनाही या चित्रपटात आपल्याला दमदार अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार त्याही खात्री पटते. पूजाने आत्तापर्यंत आपल्या चाहत्यांना नेहमीच दमदार भूमिका आणि नाविन्यपूर्ण अभिनयाने जिंकले आहे.

‘बळी’मधील आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना पूजा म्हणते, “विशाल फुरीयाच्या दुसऱ्या चित्रपटात म्हणजे ‘बळी’मध्येसुद्धा मी महत्वाच्या भूमिकेत आहे. आपल्याला काय साध्यकरायचे आहे आणि त्यासाठी काय करण्याची गरज आहे, याची परिपूर्ण काल्पना असलेल्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची मजा काही औरच असते. तेच विशालच्या बाबतीत म्हणता येईल.या चित्रपटात काम करण्याचा आनंद दुहेरी होता कारण मला या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्वप्निल जोशीबरोबर काम करण्याची संधी मिळाली. 

‘बळी’मध्ये काम करण्याचे समाधान फार मोठे आहे ते दोन कारणांसाठी. एक म्हणजे, विशाल हा असा दिग्दर्शक आहे की जो अभिनेत्यामधील १०० टक्के क्षमतेचा वापर करून घेतो आणि दुसरे म्हणजे या चित्रपटात मी जी डॉक्टरची भूमिका करत आहे ती या कथेचा एक अविभाज्य आणि महत्वाचा भाग आहे. विशालचापहिला थ्रिलर चित्रपट ‘लपाछपी’हा खूप यशस्वी ठरला होता आणि त्यात दिग्दर्शक म्हणून त्याची कामगिरी फारच उजवी झाली होती. ‘लपाछपी’मध्ये त्याची दिग्दर्शकीय क्षमता अगदी जवळून पहिली होती आणि त्यामुळे त्याने जेव्हा या चित्रपटासाठी विचारले तेव्हा नाही म्हणायचे काही करणाच नव्हते,” ती म्हणते.

पूजा सावंतने क्षणभर विश्रांती, दगडी चाळ, बोनस, सुभाष घाई यांचा हिंदी चित्रपट ‘विजेता’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका करून स्वतःची अशी अमीट छबी निर्माण केली होती. या बहुप्रतीक्षित अशा मराठी चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्स’ने केली आहे. ‘जीसिम्स’ने आत्तापर्यंत मोगरा फुलाला, बोनस आदी चित्रपट आणि वेब सिरीज समांतर १ व  २ आणि नक्सलबारीची निर्मिती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.