बॉलिवूडचे 'अँग्री यंग मॅन' म्हणजेच अमिताभ बच्चन हे आपल्या कामाबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल ब्लॉगमध्ये लिहित असतात. नुकतंच बिग बी यांनी सांगितले की, त्यांच्या घरात वटवाघुळाचा शिरकाव झाला आहे आणि त्यामुळे ते खूप अस्वस्थ आणि घाबरलेले आहेत. वटवाघुळाला घरापासून दूर ठेवण्याचे सर्व उपाययोजना करूनदेखील ते पुन्हा येत असल्याने ते त्रस्त झाले आहेत.
अमिताभ बच्चन यांनी लिहिलं, 'सर्व उपाययोजना करूनही वटवाघूळ पुन्हा घरात आलं. त्याला रोखण्यासाठी आमची धडपड चालू आहे. कुटुंबातील सदस्यसुद्धा घाबरलेले आहेत.' वटवाघुळाने घरात प्रवेश करू नये यासाठी कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात, असा प्रश्न त्यांनी चाहत्यांनी विचारला आहे. 'आतापर्यंत आम्ही विविध उपाय करून पाहिले. पण सामान्य उपायांपेक्षा वेगळं काही असेल तर ते नक्की सांगा. आम्ही घरात धूर दिला, औषध फवारणी केली, निलगिरी तेलाचा फवारादेखील केला," असं त्यांनी सांगितलं.
अमिताभ बच्चन सध्या कौन बनेगा करोडपती या रिअॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालन करत आहेत. ते लवकरच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात दिसणार आहेत. त्याचप्रमाणे ते झुंड, गुड बाय आणि द इंटर्न या चित्रपटातही झळकणार आहेत. अनुपम खेर आणि परिणीती चोप्रा यांच्या भूमिका असलेल्या ‘उंचाई’ या चित्रपटातही ते काम करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.