Beast Box Office: विजयच्या Beast नं KGF 2 पुढे टेकले गुडघे, रॉकीचा जाळ

नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित बिस्ट (Beast) या चित्रपटातील हबीबी नावाचं गाणं गेल्या काही दिवसांपासून ट्रेडिंग आहे.
Kgf 2 and Beast
Kgf 2 and Beast esakal
Updated on

Beast Movie- नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित बिस्ट (Beast) या चित्रपटातील हबीबी नावाचं गाणं गेल्या काही दिवसांपासून ट्रेडिंग आहे. त्यावरुन सर्वाधिक (Tollywood News) रिल्स देखील तयार झाले आहेत. लॉक डाऊनच्या काळात सर्वाधिक हिट झालेला चित्रपट थलापती विजयचा मास्टर (Thalapathy vijay) हा होता. थिएटरमध्ये देखील त्याच्या मास्टरला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. सध्या बॉक्स ऑफिसवर यशचा केजीएफ 2 हा धुमाकूळ घालताना दिसत आहे. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यानं अल्पावधीतच मोठी कमाई केली आहे. केजीएफ आणि बिस्ट यांची काट्याची टक्कर दिसुन येत आहे. केजीएफचा मोठा झटका बिस्टला बसणार असल्याचे यापूर्वी अनेकांनी विजयच्या बिस्टला केजीएफ मात देणार असे म्हटले होते. आता आकडेवारीतून ती गोष्ट खरी ठरताना दिसत आहे.

केजीएफचं मोठं वादळ बॉक्स ऑफिसवर घोंघावताना दिसत आहे. त्यानं ज्याप्रकारे चाहत्यांना भुलवले आहे तेवढा प्रभाव काही विजयच्या बिस्टचा पडलेला दिसत नाही. बिस्ट प्रदर्शित होऊन चार दिवस होऊन गेले आहे. मात्र यशच्या केजीएफनं बिस्टला टक्कर देत मोठी कमाई केली आहे. चार दिवसांपासून केजीएफचं आघाडीवर आहे. त्यामुळे बिस्टनं केजीएफपुढे हार पत्करल्याचे दिसून आले आहे. नेटकऱ्यांनी देखील विजयचा बिस्ट प्रदर्शित करण्याचा निर्णय चुकल्याचे म्हटले आहे. टॉलीवूडमध्ये विजय आणि यश यांचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र यशचा 2018 मध्ये प्रदर्शित झालेला केजीएफ 1 हा चार वर्षानंतर चाहत्यांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे त्याची उत्सुकता अधिक होती. बिस्टच्या ट्रेलरला मोठा प्रतिसाद मिळाला होता.

Kgf 2 and Beast
Viral Video: एवढं महत्वाचं आहे का फोनवर बोलणं? पाहा काय घडलंय

थिएटरमध्ये केजीएफ पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे. त्या तुलनेत बिस्टला प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी आहे. आकडेवारी सांगायची झाल्यास, शनिवारी बिस्टनं दहा ते बारा कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे केजीएफनं 18 ते 20 कोटींची कमाई करत वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विजयच्या बिस्टनं गेल्या तीन दिवसांमध्ये 70 कोटींची कमाई केली आहे. त्यात आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि कर्नाटकात देखील बिस्टला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो आहे. तीन दिवसांत बिस्टनं 143 कोटींचा व्यवसाय केल्याचे दिसून आले आहे. सन पिक्चर्सच्या वतीनं बिस्टची निर्मिती करण्यात आली असून त्याचे दिग्दर्शनं नेल्सन यांनी केले आहे. हा चित्रपट एका रॉ एजंटवर आधारित आहे. त्यात प्रमुख भूमिका थलापती विजयनं साकारली असून प्रमुख अभिनेत्री म्हणून पुजा हेगडेनं दमदार अभिनय केला आहे.

Kgf 2 and Beast
Viral Video: चॉकलेट आप्पे कधी खाल्लेत का? पाहा व्हिडीओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.