Movie Review; बेल नव्हे 'फेल बॉट्म'

बॉलीवूडमध्ये एकदा का एका गोष्टीचा ट्रेंड आला की त्यावर कित्येक चित्रपट तयार करणं हा एक नियमच होऊन जातो.
Movie Review; बेल नव्हे 'फेल बॉट्म'
Updated on

बॉलीवूडमध्ये एकदा का एका गोष्टीचा ट्रेंड आला की त्यावर कित्येक चित्रपट तयार करणं हा एक नियमच होऊन जातो. आपल्याकडे कोणत्या तरी निमित्तानं का होईना देशभक्तीचं वारं घोंघावयाला लागलं की, त्यानुसार बाकीचेही त्या प्रवासात सहभागी होत असल्याचे दिसुन आले आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं काही देशभक्तीपर चित्रपट प्रदर्शित झाले. त्यात उल्लेख करायचा झाल्यास भुज आणि शेरशाहचा यांची नावं सांगावी लागतील.या दोन्हींमध्ये शेरशाहनं बाजी मारल्याचे दिसुन आले. भुजकडून प्रेक्षकांना फार मोठ्या अपेक्षा होत्या. त्यात अजय देवगण सारखा मोठा कलाकार होता. त्याच्या जोडीला इतरही मोठ्या अभिनेत्यांची फौज होती. त्यात उल्लेख करायचा झाल्यास संजय दत्त, शरद केळकर, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही ही नावं आहेत. असे असूनही हा चित्रपट सपशेल फ्लॉप झाला. आणि शेरशाहनं प्रेक्षकांची पसंती मिळवली. सध्या त्याच्यावर सोशल मीडियातून कौतूक होताना दिसून आले आहे.

आता अक्षय कुमारचा बहुचर्चित असा बेल बॉटम नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. वास्तविक काही महिन्यांपूर्वीच हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र तसं झालं नाही. लॉकडाऊनचा मोठा या चित्रपटाला बसला होता. लॉकडाऊननंतर थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट म्हणून बेल बॉटमचे नाव घ्यावे लागेल. त्याच्याविषयी सांगायचं झाल्यास अक्षयनं या चित्रपटातून प्रेक्षकांची निराशा केली आहे. त्याच्या यापूर्वीच्या बेबी, नाम शबाना सारख्या स्पाय चित्रपटांमधून त्यानं यापूर्वी गुप्तहेर, त्याचं आयुष्य सारख्या विषयांना पडद्यावर मांडलं आहे. मात्र तोच तो विषय पुन्हा मांडून फक्त त्याला वेगळी फोडणी देऊन साकारण्यात अक्षयला काय साध्य करायचं होतं. हा प्रश्न चित्रपट पाहिल्यावर पडतो. फार काही अपेक्षा ठेवून जर तुम्ही बेल बॉटमच्या वाट्याला जाणार असाल तर तुमची निराशा होऊ शकते.

नवीन भारत ही संकल्पना घेऊन सध्या काही निर्माते आणि दिग्दर्शक तयारीनिशी उतरले आहेत. त्यात अक्षयचेही नाव सांगावं लागेल. देशभक्तीपणा दाखविण्यासाठी एखादी स्टोरी तयार करायची, त्याला स्पायगिरीचा मसाला लावायचा, गोष्ट पुढे सरकत नाही म्हटल्यावर त्यात एखाद दोन गाणी अॅड करायची, आपल्याला वाट्टेल तशी कथेची मोडतोड करुन प्रेक्षकांना आपल्याला जे अपेक्षित आहे तेच दाखवण्याचा अट्टाहास गेल्या काही कलाकृतींपासून दिसून आला आहे. बेल बॉटमही त्यापैकी एक आहे. दिग्दर्शक रणजित एम तिवारी यानं वेगळ्या पद्धतीनं बेल बॉटमची मांडणी करण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र तो त्यात यशस्वी झालेला नाही. हे नमुद करावं लागेल.

अक्षयनं बेल बॉटममध्ये एका स्पायची भूमिका साकारली आहे. 'अब हिंदूस्थान नही झुकेगा, इस बार उनकी हार' असा संवाद त्याच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळतो. आणि आपण मोठ्या अपेक्षा घेऊन बेल बॉटम पाहायला लागतो. जसजसा चित्रपट पुढे सरकू लागतो तसे आपल्याला त्या कथेतील फोलपणा जाणवू लागतो. चित्रपटात अॅक्शन आहे, गाणी आहेत, सस्पेन्सही आहे. मात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारं असं काही नाही. हे सारखं जाणवत राहतं. आणि तेच बेल बॉटमचं अपयश म्हणावं लागेल. ८० च्या दशकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रिलेशन कसे होते, दरम्यानच्या काळात भारतातील आणीबाणीची परिस्थिती, त्याचा देशाच्या संरक्षण यंत्रणेवरही झालेला परिणाम याची मांडणी करण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न आहे. मात्र तो फसला हे बेल बॉटम पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल.

पाकिस्तान फोबिया हा विषय केंद्रस्थानी घेऊन त्यालाच वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा ट्रेंडही यशस्वी होताना दिसतो आहे. आपण यापूर्वीचे काही चित्रपट पाहिल्यास त्यातूनही आपल्याला ही संकल्पना मांडल्याचे दिसुन येईल. या चित्रपटामध्ये इंदिरा गांधींची भूमिका लारा दत्तानं केली आहे. सुरुवातीला तिच्या या वेगळेपणाची खूप चर्चा झाली होती. अनेकांनी तर तिला ओळखलेही नव्हते. इतका तो वेगळा गेट अप होता. मात्र मेक अप वेगळा करता येतो. अभिनयाचे काय, हा प्रश्न पुन्हा एकदा लारा दत्ताच्या बाबत प्रेक्षकांना पडल्याशिवाय राहणार नाही. कथानक समजून घेण्याच्या प्रयत्नात असताना अचानक येणारं गाणं नेमकं कशासाठी हाही प्रश्न प्रेक्षकाला हैराण करतो.

Movie Review; बेल नव्हे 'फेल बॉट्म'
'तुला गडकरींचा फोन नाही आला का?', कपिलचा अजय देवगणला उपरोधिक प्रश्न
Movie Review; बेल नव्हे 'फेल बॉट्म'
'बिग बी तुम्ही झोपा,आम्हालाही झोपू द्या',का म्हणाले युझर्स असं?

अक्षयच्या इतर देशभक्तीपर चित्रपटांसारखाच हाही एक चित्रपट आहे. एवढचं यानिमित्तानं सांगता येईल. कथानक मुळात फार सैल स्वरुपाचं आहे. ते मनाची पकड घेत नाही. दुसरं म्हणजे आपल्या कथानकांमध्ये संकल्पनेपेक्षा हिरोइझमला देण्यात येणारं अवास्तव महत्व त्यानंही आपण प्रेक्षकांची निराशा करतो आहोत हे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या कधी लक्षात येणार हा एक बेसिक प्रश्न बेल बॉटमच्या निमित्तानं विचारावासा वाटतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.