Goutam Halder Died: चित्रपट निर्माते गौतम हलदर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! विद्या बालनला केलं होत लाँच!

Goutam Halder Died
Goutam Halder DiedEsakal
Updated on

Goutam Halder Died: मनोरंजन चित्रपटसृष्टीतून बंगाली अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बंगाली चित्रपट निर्माते आणि थिएटर कलाकार गौतम हलदर यांचे निधन झाले आहे. गौतम हलदर यांचे शुक्रवारी कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

वयाच्या 67 व्या वर्षी खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छातीत दुखू लागल्याने हलदर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथेच त्यांचे निधन झाले.

त्यांच्या मृत्यूने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सोशल मीडियावर गौतम हलदर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Goutam Halder Died
Naal 2 Marathi Movie Trailer : नागराजच्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित 'नाळ २' चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

गौतम हलदर यांनी नुकत्याच झालेल्या रवींद्रनाथ टागोरांच्या 'रक्त कारबी'सह 80 स्टेज प्रॉडक्शन्सचे दिग्दर्शन केले होते. हलदर यांनी 2003 मध्ये 'भलो थेको' हा पहिला बंगाली चित्रपट बनवला होता, ज्यामध्ये अभिनेत्री विद्या बालन मुख्य भूमिकेत दिसली होती. त्यानंतर त्यांनी 2019 मध्ये 'निर्वाण' देखील दिग्दर्शित केला होता, ज्यामध्ये राखी गुलजार मुख्य भूमिकेत होत्या.

'प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि थिएटर कलाकार गौतम हलदर यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. त्यांच्या निधनाने सांस्कृतिक जगताची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना माझ्या संवेदना." अशा शब्दात त्यांच्या निधनावर शोक व्यक्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे.

गौतम हलदरचे चाहते आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील लोक सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली देत आहेत.

Goutam Halder Died
Milind Soman Happy Birthday : सलमान, शाहरुख, आमिर त्याच्यापुढे सगळे फिकेच! फिटनेसचा नाद नाय

गौतम हलदर यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी विद्या शुक्रवारी संध्याकाळी कोलकाता येथे पोहोचल्याचा दावा केला जात आहे. निर्मात्याच्या आकस्मिक निधनाने दु:ख झाल्याचे तिने सांगितले.

विद्या बालनने 2003 मध्ये 'भलो थेको' चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते, ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलजार मुख्य भूमिकेत होत्या. विद्या बालन त्यांच्या पहिल्या चित्रपटात मुख्य अभिनेत्री होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.