अभिनेत्याच्या कुटुंबाच कर्ज फिटलं, अभिनेत्रीने संकटाच्या काळात दिली साथ

अभिनेता दीपेश भानचं जुलै महिन्यात निधन झाले होते. कुटुंबावर मोठं कर्ज होतं. अशा संकटाच्या वेळी अभिनेत्री धावून आली.
Saumya Tandon And Deepesh Bhan
Saumya Tandon And Deepesh Bhan esakal
Updated on

Bhabi Ji Ghar Par Hai Deepesh Bhan And Saumya Tandon : 'भाभी जी घर पर है' मालिकेचा अभिनेता दीपेश भान (Deepesh Bhan) यांचे जुलैमध्ये निधन झाले होते. यामुळे त्यांच्या कुटुंबीय, मित्रांना आणि टीव्ही विश्वातील सहकार्यांना धक्का बसला होता. दिवंगत अभिनेत्याच्या पश्चात पत्नी आणि दीड वर्षांचा मुलगा आहे.

अचानक त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या पत्नी भावनिक धक्का सहन करु शकल्या नव्हत्या. तसेच त्यांच्या समोर ५० लाख गृहकर्ज भरण्याचे आव्हान होते. दिपेशबरोबर एकेकाळच्या सहकलाकार 'भाभी जी घर पर है' मधील अभिनेत्री सौम्या टंडनने (Saumya Tandon) त्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी निधी जमा करण्यास पुढे आल्या.

Saumya Tandon And Deepesh Bhan
KRK च्या अडचणीत वाढ, १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी

आताच्या माहितीनुसार दीपेश भानच्या कुटुंबाने पूर्ण गृहकर्ज (Home Loan) फेडले आहे. त्याच्या पत्नीने नुकताच एक व्हिडिओ पतीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करुन ही माहिती दिली. तिने सौम्या टंडन आणि मालिकेची निर्माता बेनैफेर कोहलींचे आभार मानले. ती व्हिडिओत म्हणते, जेव्हा माझ्या पतीचा अचानक मृत्यू झाला, त्यावेळी गृहकर्ज कसे फेडायचे हा प्रश्न उभा होता. मी आर्थिकदृष्ट्या समक्ष नव्हते.

Saumya Tandon And Deepesh Bhan
'ब्रह्मास्त्र'ची दमदार सुरुवात, प्रदर्शनापूर्वीच २७ हजार तिकिटांची विक्री

तसेच मला कोणाचा पाठबळही नव्हते. त्यावेळी सौम्या टंडन माझ्या आयुष्यात आल्या आणि त्यांनी निधी जमा करण्यास सुरुवात केली. आम्ही कर्ज फेडू शकलो. हा व्हिडिओ बनवण्यामागे प्रत्येकासमोर सौम्याचे आभार मानणे हाच आहे. मी बेनैफेर कोहली यांचेही आभार मानते. तिचा आताही मला आधार मिळतोय. मनापासून तुम्हा दोघांचे खूप खूप आभारी आहे. (Entertainment News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.