Bhakshak Trailer : 'भूमी' अन् 'सई' ताम्हणकरच्या 'भक्षक' मध्ये काय आहे जीवघेणं सत्य?

आपल्या हटक्या भूमिकांमुळे नेहमीच चाहत्यांच्या कौतुकाचा आणि प्रतिक्रियेचा विषय ठरलेली भूमी पेडणेकर ही आता भक्षक नावाच्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
Bhakshak Trailer Viral Bhumi Pednekar Dashing Role
Bhakshak Trailer Viral Bhumi Pednekar Dashing Role esakal
Updated on

Bhakshak Trailer Viral Bhumi Pednekar Dashing Role : आपल्या हटक्या भूमिकांमुळे नेहमीच चाहत्यांच्या कौतुकाचा आणि प्रतिक्रियेचा विषय ठरलेली भूमी पेडणेकर ही आता भक्षक नावाच्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नेटफ्लिक्सवर येणाऱ्या या चित्रपटाचा आता ट्रेलर समोर आला असून त्यावर चाहत्यांच्या कौतुकाचा वर्षाव होताना दिसून येत आहे.

भूमीनं या चित्रपटामध्ये एका महिला पत्रकाराची भूमिका वठवली असून तिच्या सोबत सई ताम्हणकरचा खादी वर्दीतला अंदाजही चाहत्यांच्या कमेंटचा विषय आहे. सोशल मीडियावर आलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा आहे. भूमीनं शोध पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराची भूमिका करत एका ज्वलंत विषयाला बोलतं करण्याचा प्रयत्न केला आहे.

अल्पवयीन मुलींचे होणारे अपहरण आणि त्यांच्यावर होणारे लैंगिक अत्याचार या विषयावर दिग्दर्शित पुलकित यांचा भक्षक काही वेगळ्या गोष्टी मांडू पाहतो. गेल्या काही दिवसांपासून भूमीच्या या प्रोजेक्टची चर्चा होती. भूमीनं आतापर्यत तिच्या चित्रपटांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका वठवल्या आहेत. त्याचे चाहत्यांकडून कौतुकही होत आहे.

शेल्टर होम मधील अल्पवयीन मुलींना कोणत्या जीवघेण्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं हे भक्षकच्या माध्यमातून दिग्दर्शकानं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते प्रकरण पत्रकार म्हणून समोर आणल्यानंतर भूमीवर येणारा दबाव, तिला मिळणाऱ्या जीवघेण्या धमक्या, पोलीस आणि राजकीय हस्तक्षेप यावर चित्रपटाच्या ट्रेलरमधून वेगळ्या गोष्टी समोर येताना दिसतात.

यामध्ये भूमीसह आदित्य श्रीवास्तव, संजय मिश्रा, सुर्या शर्मा यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट वास्तव घटनेवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी भूमीनं आपण सध्या नेमक्या कोणत्या काळात राहतो आहोत, आपल्या संवेदना जाग्या आहेत की नाही, तुम्ही स्वताला भक्षक तर समजत नाही ना, असे प्रश्न भूमीनं उपस्थित केले आहेत.

Bhakshak Trailer Viral Bhumi Pednekar Dashing Role
Manoj Bajpayee : मनोज वाजपेयीला मिळाला 'Champions of Change Maharashtra' पुरस्कार, आणखी कोणत्या सेलिब्रेटींचा समावेश?

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखनं देखील या चित्रपटाच्या ट्रेलरवर कमेंट केली आहे. त्यानं म्हटले आहे की, अशा प्रकारच्या चित्रपटांची गरज आहे. एका वेगळ्या विषयाला या माध्यमातून बोलतं करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक घटनेवर आधारित भक्षक हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.