Bharat Jadhav: "मुंबईत घर घ्यायला हिंमत लागते", भरत जाधव यांच्या नवीन नाटकाचा अस्वस्थ करणारा प्रोमो भेटीला

भरत जाधव यांचं नवीन नाटक 'अस्तित्व' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय
bharat jadhav new marathi natak astitva promo out starring chinmayee sumeet
bharat jadhav new marathi natak astitva promo out starring chinmayee sumeet SAKAL
Updated on

Astitva Marathi Natak News: गेल्या अनेक महिन्यांपासुन मराठी रंगभुमीवर दर्जेदार नाटकं जाणकार रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. प्रिया बापट - उमेश कामतचं जर तरची गोष्ट, अशोक सराफ - निर्मिती सावंत यांचं व्हॅक्युम क्लिनर अशी अनेक नाटकं सध्या रंगभुमीवर हाऊसफुल्ल गर्दीत सुरु आहेत. अशातच एक नवीन नाटक मराठी रंगभुमीवर येणार आहे. ते म्हणजे भरत जाधव यांची प्रमुख भुमिका असलेलं अस्तित्व.

(bharat jadhav new marathi natak astitva promo out starring chinmayee sumeet)

bharat jadhav new marathi natak astitva promo out starring chinmayee sumeet
Prajakta Mali: प्राजक्ता माळी RSS च्या दसरा मेळाव्यात सहभागी, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "आयुष्यात पहिल्यांदा.."

भरत जाधव बऱ्याच कालावधीनंतर वेगळ्या रुपात

कायम विनोदी भुमिकांसाठी लोकप्रिय असणारे भरत जाधव अस्तित्व नाटकाच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

भरत जाधव एण्टरटेनमेंट निर्मित 'अस्तित्व' हे नाटक लवकरच नाट्यप्रेमींच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे.

स्वप्नील जाधव लिखित, दिग्दर्शित 'अस्तित्व' या नाटकाचा येत्या ३ नोव्हेंबर रोजी शुभारंभाचा प्रयोग असून यात चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव, श्याम घोरपडे, जयराज नायर आणि भरत जाधव प्रमुख भूमिकेत आहेत.

काय आहे अस्तित्व नाटकाची कथा ?

अस्तित्व नाटकाची कथा आहे एका कुटुंबाची कहाणी. कुटुंबातील एकमेव कमावणाऱ्या आणि नोकरीतून लवकरच निवृत्त होणाऱ्या संतोष हसोळकर नाटकाच्या केंद्रभागी आहे. ज्याने निवृत्तीनंतर मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्याच्या या निर्णयाला घरच्यांचा विरोध असून प्रत्येक जण आपल्या अस्तित्वाच्या शोधात आहेत. त्यामुळे आता त्यांची ही धडपड यशस्वी होणार का? याचे उत्तर आपल्याला येत्या काळात मिळणार आहे.

या नाटकाच्या निमित्ताने सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव हे नवोदित कलाकार व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहेत.

अस्तित्व नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग

भरत जाधव अभिनीत स्वप्नील जाधव यांनी अस्तित्व नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग पुढीलप्रमाणे...

शुभारंभ प्रयोग :
शुक्रवार ३ नोव्हेंबर दु. ४:३० वा. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली
शनिवार ४ नोव्हेंबर दु. ४:३० वा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, पार्ले
रविवार ५ नोव्हेंबर दु. ३:३० वा. श्री. शिवाजी मंदिर, दादर
रविवार ५ नोव्हेंबर रा. ८:३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.