भरत जाधवच्या नावाखाली फसवणूक; अभिनेत्याने उघडकीस आणला प्रकार

अनेकदा मनोरंजन क्षेत्रातील मोठी नावं घेऊन लोकांची फसवणूक केली जाते.
bharat jadhav
bharat jadhavinstagram
Updated on

अनेकदा मनोरंजन क्षेत्रातील मोठी नावं घेऊन लोकांची फसवणूक केली जाते, त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. नुकतीच अशी एक घटना समोर आली आहे. अभिनेता भरत जाधवचं Bharat Jadhav खोटं नाव सांगून पैसे मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खुद्द भरतने सोशल मीडियावर याविषयीची पोस्ट लिहिली आहे. घडलेल्या प्रकाराची माहिती देत भरतने अशा भूलथापांना बळी पडू नका असं आवाहन चाहत्यांना केलं आहे.

भरत जाधवची पोस्ट-

'काल एका व्यक्तीचा मेसेज आला की तुमच्या सिनेमात काम करण्यासाठी मुंबईतील एका एजंटने आमची ऑडिशन घेतली आणि सिलेक्शन झाले असून फोटोशूट व पुढील प्रोसेसिंग फीच्या नावाखाली १५ हजार रुपयांची मागणी केली. मी सर्वांना सांगू इच्छितो की, माझ्या कोणत्याही सिनेमाचं असं कुठेही ऑडिशन सुरू नाही. जर कोणी माझ्या नावाचा गैरवापर करून किंवा माझ्यासोबतचा एखादा फोटो दाखवून सिनेमात काम मिळवून देतो असे आश्वासन देत असेल तर अशा भूलथापांना बळी पडू नका. कोणालाही पैसे देऊ नका. संबंधित व्यक्तींवर लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई होईल,' असं भरत जाधवने पोस्टद्वारे स्पष्ट केलं.

bharat jadhav
'अरेच्चा, हे तर छगन भुजबळच!'; महेश मांजरेकरांच्या नव्या लूकवर कमेंट्सचा पाऊस
bharat jadhav
'अरे, कुठे नेऊन ठेवली ही मालिका'; 'अरुंधती'च्या वागण्यावर भडकले प्रेक्षक

चित्रपटात काम देतो असं सांगून पैसे उकळल्याच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत. लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी भरतने पोस्ट लिहित आवाहन केलं आहे. त्याचप्रमाणे संबंधित व्यक्तींवर कारवाई होणार असल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()