Bharat Jadhav Birthday: आत भरतचा प्रयोग सुरू होता, आणि गेटवर प्रेक्षक त्याच्या वडीलांना शिव्या घालत होते.. त्या दिवशी..

आज भरत जाधवचा वाढदिवस, त्यानिमित्ताने हा खास किस्सा
bharat jadhav shared memory of struggle period his taxi driver father got insulted by passenger who came for actors play
bharat jadhav shared memory of struggle period his taxi driver father got insulted by passenger who came for actors playsakal
Updated on

Bharat Jadhav Birthday: आज भरत जाधवचा वाढदिवस. नाटक, मालिका, चित्रपट अशा एकूणच मनोरंजन विश्वातील नाना माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारा अभिनेता म्हणजे भरत जाधव. सध्या त्यांचे 'सही रे सही' नाटक जोरदार सुरू आहे. शिवाय 'तू तू मी मी' या नव्या नाटकाचा त्याने नुकताच शुभारंभ केला.

भरत आणि विनोद एक वेगळच समीकरण आहे. मुंबईत वाढलेल्या भरतला चाळीतलं जीवन, साधेपणा याविषयी प्रचंड ओढ आहे. तो साधेपणा त्याने स्वतः वैयक्तिक आयुष्यातही जपला आहे.

तुम्हाला माहीतच असेल की भरतचे वडील टॅक्सी ड्राइव्हर होते. त्यामुळे भरतचं आयुष्य प्रचंड संघर्षमय होतं. तो कायमच त्यांच्या आई वडिलांनी केलेल्या कष्टाविषयी भरभरून बोलत असतो.

भरतचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. त्याचा प्रयोग सुरू होता आणि नाट्यगृहाच्या बाहेर प्रेक्षक त्याच्या वडिलांना शिव्या देत होते.. तर जाणून घेऊया नेमका काय आहे हा प्रसंग..

(bharat jadhav shared memory of struggle period his taxi driver father got insulted by passenger who came for actors play)

एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भरतने हा डोळ्यात पाणी येईल असा भावनिक किस्सा सांगितला आहे. भरत जाधव म्हणाला, ''माझे वडील मुंबईत टॅक्सीचालक होते.  एक दिवशी ते रात्री घरी आले आणि म्हणाले तुझा आज शिवाजी मंदिरला प्रयोग होता का?.. त्यावर मी म्हणालो हो.. काय झालं.. तर वडील म्हणाले, 'अरे तुझ्या नाटकाला आलेल्या एका प्रवाशाने मला उशीर झाला म्हणून शिवाजी मंदिरच्या बाहेरच मला खूप शिव्या दिल्या.'

''पण आपल्या मुलाच्याच नाटकाला जाण्यासाठी भांडतायत हे बघून बरं वाटलं.. मी काही बोललो नाही'' असंही त्याचे वडील म्हणाले. हा प्रसंग ऐकून भरत हादरून गेला. वडीलांचा हा अपमान भरतच्या जिव्हारी लागला. त्यानंतर भरतने वडिलांना यापुढे टॅक्सी चालवू नका, असं स्पष्ट सांगितलं.

भरत जाधव म्हणाला, तुम्हाला दिवसभर टॅक्सी चालवून दिवसाचे 100 रुपये मिळतात मी तीन प्रयोग करून ३०० रुपये कमवीन पण तुम्ही टॅक्सी चालवणं सोडा.

हेही वाचा : Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

''पण भरतच्या वडिलांनी तसे केले नाही. कारण उद्या नाटकाचा भरवसा नाही, ते चालले नाही तर काय करायचे. म्हणून त्यांनी सहा महीने वाट पाहिली. टॅक्सी चालवणं बंद केलं पण सहा महिने टॅक्सी चाळीत तशीच उभी होती.'' असं भरतने या मुलाखतीत सांगितलं आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()