'राज ठाकरे चटकन कुणाला जवळ करत नाहीत, पण..' भरत जाधवने सांगितली खास बात

राज ठाकरे यांच्या वाढदिवशी भरत जाधवने एक पोस्ट लिहून काही खास गोष्टी उघड केल्या आहेत.
bharat jadhav shared post for raj thackeray and wish birthday
bharat jadhav shared post for raj thackeray and wish birthday sakal
Updated on

bharat jadhav : नाटक, मालिका, चित्रपट अशा एकूणच मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारा अभिनेता भरत जाधव कायमच महत्वपूर्ण विषयवार भाष्य करत असतो/ नुकतेच त्याने नाट्यगृहाच्या दुरवस्थेवर लक्ष वेधले होते. तो सोशल मीडियावर सक्रिय असतो. मनोरंजन क्षेत्रातील काही आठवणी, रंजक किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तर कधी एखादे निमित्त साधून आपल्या जवळच्या व्यक्तीविषयी भरभरून लिहितो. अशीच एक पोस्ट त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यासाठी लिहिली आहे. यामध्ये त्याने अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. (bharat jadhav shared post for raj thackeray and wish birthday)

bharat jadhav shared post for raj thackeray and wish birthday
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी.. दीपिकाची प्रकृती स्थिर, पुन्हा सेटवर..

राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असतो. या दिवसाचं औचित्य साधून भरतने एक खास खास पोस्ट लिहिली. यात राज यांचा स्वभाव नेमका कसा आहे इथपासून ते कलाकारांसोबतचे त्यांचे संबंध कसे आहेत याचं वर्णन केलं आहे. भरत म्हणतो, 'मा. राजसाहेब ठाकरे..!! खुप वर्षांपासून ची ओळख. मुळात ते राजकारणात जरी सक्रिय असले तरी जेंव्हा कधी आम्ही भेटतो तेंव्हा ते राजकारण या विषयावर अजिबात बोलत नाहीत. मराठी नाटक... मराठी सिनेमा मध्ये सध्या काय चाललंय. जागतिक सिनेमामध्ये सध्या काय चाललंय यावरच सगळ्या गप्पा असतात. सगळ्याच कलाकृतींवर त्यांचं चांगलं निरीक्षण असतं. आपण कुठल्या नवनवीन गोष्टी करायला हव्यात हेही ते सुचवतात.'

bharat jadhav shared post for raj thackeray and wish birthday
'या' दिवशी येतोय 'कॉफी विथ करण'चा 7 वा सिझन, 'या' कलाकारांची होणार पोलखोल

पुढे तो म्हणतो, 'मध्यंतरी कोरोना काळात केदार त्यांना भेटायला गेला तेंव्हा लॉकडाऊन आणि त्या सर्व गोंधळात नाट्यगृह आणि चित्रपटगृह काही लवकर उघडण्याची चिन्ह दिसत नाहीत म्हणून पुन्हा टेलिव्हिजन करा हे सुचवणारे ही तेच. त्यातुनच पुढे 'सुखी माणसाचा सदरा' ची निर्मिती झाली ज्याद्वारे मी टिव्ही वर पुनरागमन केलं.'

'मुळात त्यांचा स्वभाव असा आहे की ते चटकन कुणाला जवळ करत नाहीत आणि एकदा केलं तर त्याच्यासाठी हवं ते सर्व करण्यासाठी सिद्ध होतात. वेळोवेळी कुठे चुकत असाल तर कानउघाडणी ही करतात आणि चांगलं काम केलं तर मनापासून कौतुकही करतात.अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वास व दिलदार नेत्यास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!' अशा शब्दात भरतने राज ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.