Jackie Shroff Reaction On India Vs Bharat : सध्या देशात India Vs Bharat हा एक चर्चेचा मुद्दा झाला आहे. देशाचे एकच नाव असावे आणि ते नाव भारत असावे. या मुद्द्यावर आता बरेच वाद सुरु झालेले दिसत आहे. त्यात राजकारणापासून ते सर्व सामान्य लोकांपर्यंत सर्वांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यातच आता मनोरंजन विश्वातील कलाकरांनीही यावर प्रतिक्रिया देत आपलं मत स्पष्ट व्यक्त केले आहे.
त्यातच यावर सर्वात आधी अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर कंगना राणौत आणि साउथच्या अभिनेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आता त्यातच अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणी मीडियाशी बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाले की, "जर भारताला भारत म्हटलं जात असेल तर यात काय वाईट गोष्ट नाही . इंडिया हा इंडिया आहे, भारत हा भारत आहे. आता माझं नाव जॅकी आहे पण काहीजण मला जॉकी म्हणतात आणि काही मला जैकी म्हणतात. त्यांनी माझे नाव खूप तोडलयं पण मी माझं नाव नाही बदलणार. आपण कसं नाव बदलणार . नाव बदललं तरी आपण थोडीच बदलणार."
दिल्लीत G20 शिखर परिषद 9-10 सप्टेंबर रोजी होणार आहे. यात अनेक कलाकरांना डिनरसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. जॅकी श्रॉफ हे दखील त्यात सामिल होणार आहे. जॅकी श्रॉफ यांना राष्ट्रपती भवनात 'भारताचे राष्ट्रपती' या नावाने G20 शिखर संमेलनाचे निमंत्रण पाठवल्याबद्दल त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
तर दुसरीकडे कंगनाने देखील यावर प्रतिक्रिया देण्यासाठी तिचे जुने ट्विट पुन्हा शेयर केले. त्यात तिने लिहिले की, कंगनाने तिच्या ट्विटर खात्यावर एक जुनी पोस्ट पुन्हा शेअर केली आहे.
ज्यात तिने 2021 मध्ये म्हटलं होतं की 'गुलाम नाम' इंडियाला रद्द करायला हवं. त्याऐवजी देशाला 'भारत' म्हणायला हवं.
कंगनानं आता ही पोस्ट रिशेअर करत लिहिले, "आणि काही लोक याला काळी जादू म्हणताय... ही फक्त धूसर बाब आहे प्रिये... सर्वांचे अभिनंदन!! एक गुलाम नावापासून मुक्त झालो आहोत... जय भारत.
तर तमिळ अभिनेता विष्णू विशालनेही सोशल मीडियावर एक फोटो ट्विट करताना लिहिले होते की, मी या शूट लोकेशनवरून खोलवर विचार करत आहे. काय???? नावात बदल ???? पण का???? ते आपल्या देशाच्या प्रगतीला आणि अर्थव्यवस्थेला कशी मदत करणार? अलीकडच्या काही दिवसांत मी ऐकलेली ही सर्वात विचित्र बातमी आहे. भारत नेहमीच भारत होता. आपण आपला देश नेहमीच भारत आणि इंडिया या नावाने ओळखतो. अचानक इंडिया वेगळा का झाला?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.