बाळाबाबत भारतीचा मोठा निर्णय, म्हणाली.. मोठ्यांचं ऐकावं लागतं..

कॉमेडियन भारती सिंगच्या बाळाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आपल्या बाळाला चाहत्यांसमोर आणण्यासाठी भारतीही उत्सुक आहे. पण घरचे म्हणतात..
bharti singh baby
bharti singh baby sakal
Updated on

Tv Entertainment: कॉमेडियन भारती सिंग ही आता भलतीच चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिचं बाळंतपण. यामुळे भारतीला ट्रोलही व्हावे लागले होते. बाळंत (Entertainment News) झाल्यानंतर अकरा दिवसांनीच ती पुन्हा सेटवर परतल्यानं तिला नेटकऱ्यांनी चांगलेच झापले होते. भारती तुला मुलाची काळजी आहे की (Bharti Singh) नाही असा प्रश्नही तिला विचारला होता. यावर भारतीनेही सडेतोड उत्तर दिले. आता मात्र तिचे बाळ पाहण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्या संदर्भात तिला वारंवार विचारणाही होते.

bharti singh baby
जनमताचा 'कौल' आला.. आज जाहीर होणार इंडियन आयडल मराठीचा महाविजेता

परंतु आता बाळाला दाखवता येणार नाही असे भारतीने एका व्हिडीओतून सांगिलते आहे. सोबत त्याचे कारणही दिले आहे. बाळंत झाल्यानंतर रुग्णालयाबाहेर येऊनच भारती म्हणाली होती लवकरच आपण बाळासोबत भेटू. त्यामुळे हे बाळ कसं आहे, ते कधी पाहता येईल याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.

bharti singh baby
ग्रामीण व्यक्तिरेखेत दिसणार स्मिता तांबे.. येतोय हा चित्रपट..

भारती म्हणते, 'तुम्हाला बाळाला दाखवण्याची माझी फार इच्छा आहे पण सध्या मी तसे करू शकत नाही. किमान ४० दिवस बाळ मु कुणालाही दाखवू शकत नाही. काही प्रथा अशा असतात ज्या पाळाव्याच लागतात. लहान मुलाला ४० दिवस कुणाला दाखवू नये असे घरातल्या मोठ्यांनी सांगितले आहे आणि कधीतरी मोठ्यांचं ऐकणं चांगलं असतं.' असा व्हिडीओ भारतीने शेअर केला आहे. (bharti singh- will show - her baby - after 40 days)

त्यामुळे भारतीचे बाळ पाहण्यासाठी आता ४० दिवस वाट पाहावी लागणार आहे. पूर्वी बाळंतणीला स्वातंत्र्य खोली असायची. तिथे सर्व स्वच्छता राखली जायची. बाहेरील कसलाही प्रादुर्भाव त्या बाळाला होऊ नये म्हणून चाळीस दिवस बाळ आणि त्याची आई त्या खोलीत राहत असे. म्हणून ४० दिवस बाहेरच्यांना बाळ पाहण्याची परवानगी नव्हती. शिवाय काही ठिकाणी दृष्ट लागू नये म्हणूनही बाळ दाखवत नाहीत.अशा गोष्टी आपल्याला मोठ्यांकडून सांगितल्या जातात. ज्या भारतीच्या घरीही पाळल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.