Bhau Kadam Birthday: जेव्हा दागिने मोडून भाऊने मुलांसाठी केली होती 'ही' गोष्ट.. वाचून वाटेल अभिमान!

अभिनेते भाऊ कदमचा आज वाढदिवस.. वाचावा असा खास किस्सा..
Bhau Kadam Birthday actor's struggle days friends cant help him sell jewellery career lifestyle
Bhau Kadam Birthday actor's struggle days friends cant help him sell jewellery career lifestylesakal
Updated on

Bhau Kadam Birthday: मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज विनोदी अभिनेता म्हणजे भाऊ कदम. एक निरागस अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे, आणि तो तितकाच सर्वांशी मिळून मिळसून वागणारा अभिनेता आहे. त्यामुळे त्याला कमाल लोकप्रियता मिळाली आहे.

भाऊने आजवर अनेक मालिकाम नाटक, चित्रपटात काम केले आहे. पान भाऊला खरी प्रसिद्धी मिळाली ते 'फू बाई फू' आणि नंतरच्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे. आज भाऊ घराघरात पोहोचला असला तरी त्यांचं स्ट्रगल खूप मोठं आहे.

आज तो ज्या ठिकाणी विराजमान आहे त्यामागे त्याचे खूप कष्ट आहेत. त्यानं आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगनं प्रक्षकांना खळखळवून हसवलं आहे. पण त्यामागे त्याने अनेक घाव सोसलेले आहेत.

एकवेळ अशी होती ती जवळच्या मित्रांनीही त्याची साथ दिली आहे. खर्चायलाही पैसे नव्हते. पण केवळ मुलांसाठी त्याने स्वतःचे दागिने मोडले होते. नेमका काय होता हा प्रसंग, आज भाऊचा वाढदिवस त्यानिमित्ताने जाणून घेऊया..

(Bhau Kadam Birthday actor's struggle days friends cant help him sell jewellery career lifestyle)

Bhau Kadam Birthday actor's struggle days friends cant help him sell jewellery career lifestyle
Meera Joshi Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा अपघात..

भाऊ कदमने आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर काय दिवस पहावे लागतात याबाबत एका मुलाखतीत सांगितले होते. एका पुरस्कार सोहळ्यासाठी भाऊ दुबईला निघाला होता, तेव्हाचा हा किस्सा आहे.

भाऊ म्हणाला, 'एका पुरस्कार सोहळ्यासाठी दुबईला निघालो, पण तेव्हा पैसेच नव्हते माझ्याकडे. पासपोर्ट किंवा इतर सगळा खर्च महेश मांजरेकर करणार होते, आपण फक्त जायचं.. पण तरीही जाताना खिशात काही तरी पैसे असावेतच ना..'

'पण माझ्याकडे तेही नव्हते. त्यावेळी फारच अवघडल्या सारखं वाटलं.. म्हणून मित्रांकडे मागितले. १-२ हजार किंवा ५ हजार द्या मला, असं म्हटलं. पण, त्यांना खात्री नव्हती की मी पैसे परत करेन म्हणून. म्हणून त्यांनी पैसे दिले नाही.'

Bhau Kadam Birthday actor's struggle days friends cant help him sell jewellery career lifestyle
Hemangi kavi: चिघळलेली दुखापत, पायाला सूज.. तरीही हेमांगी प्रयोगाला उभी राहिली.. आणि मग जे झालं..

'पण मी त्यांचे पैसे परत करणार होतो, हे मी आधीच ठरवलं होतं. काहीतरी करुन ते देणारच होतो. पण कुणीही मला पैसे दिले नाही.'

पुढे भाऊ म्हणाला, 'शेवटी घरच्यांनी मला काही पैसे दिले आणि म्हणाले हे घे, हे ठेव. त्यावर मी विचारलं की हे पैसे कुठून आले. तर ते म्हणाले की अंगठी विकली. आणि, वरुन म्हणाले यातून काहीही पैसे परत आणू नकोस. तू वापर. पण मे पैसे खर्च करायची माझी डेरिंगच झाली. त्यावेळी त्या पैशातून फक्त मुलांसाठी मी काही गोष्टी खरेदी केल्या आणि घेऊन आलो. तो दिवस कायम लक्षात राहतो.'

भाऊने सुरुवातीच्या काळात अत्यंत हलाखीत दिवस काढले. पण त्याच्या अभिनयाने तो इतक्या उंचीवर आहे की त्याला कशाचीही कमी नाही. त्याचा चाहतावर्ग मोठा आहेच, पण त्यांच्या मेहनतीने तो आर्थिकदृष्ट्याही सक्षम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.