Bhau Kadam ची मुलगी शार्क टॅंकमध्ये? वयाच्या १८ व्या वर्षापासून करतेय 'हा' बिझनेस

मृणमयी कदमनं सोशल मीडियावर कुटुंबाचे आभार मानत आपल्या बिझनेस संदर्भात केलेली एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.
Bhau Kadam,  mrunmayee kadam
Bhau Kadam, mrunmayee kadamEsakal
Updated on

Bhau Kadam daughter mrunmayee kadam: 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमामुळे घराघरात पोहचलेल्या भाऊ कदमचं स्ट्रगल खूप मोठं आहे. आज तो ज्या ठिकाणी विराजमान आहे त्यामागे त्याचे खूप कष्ट आहेत. त्यानं आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगनं प्रक्षकांना खळखळवून हसवलं आहे.

एरव्ही लाजऱ्या-बुजऱ्या वाटणाऱ्या भाऊ कदमचं स्वतःचं युट्युब चॅनल देखील आहे. पण भाऊ प्रमाणेच त्याची मोठी मुलगी देखील वयाच्या १८ व्या वर्षापासून स्वतःचा व्यवसाय करुन नाव कमावतेय बरं का.

Bhau Kadam,  mrunmayee kadam
Ratna Pathak Shah: रत्ना पाठक यांनी नव्या अभिनेत्यांची अक्षरशः लाज काढली.. म्हणाल्या,'विमानात कॉफी मागतानाही..'

भाऊ कदमची मोठी मुलगी मृण्मयी कदम हिनं ठाण्यातील बेडेकर कॉलेजमधून कॉमर्स शाखेची पदवी संपन्न केली आहे. तिचं देखील आपल्या वडिलांप्रमाणे युट्युब चॅनल आहे. तिनं वयाच्या १८ व्या वर्षी म्हणजे साधारण २०२० साली स्वतःचा ट्रेन्डी हेअर बो चा व्यवसाय सुरू केला. तिच्या ब्रॅन्डचं नाव आहे 'तारुंध्या'. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मृणमयीनं तिच्या व्यवसायासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. पण त्यामुळे मृणमयी शार्क टॅंकमध्ये जाणार का ही चर्चा सुरु झाली आहे.

मृणमयीनं खरंतर स्वतःचा खर्च स्वतः भागवण्यासाठी वयाच्या १८ व्या वर्षी व्यवसायात पदार्पण केलं. यावेळी तिच्या पाठीशी तिचं संपूर्ण कुटुंब उभं राहिलं. सुरुवातीला मृण्मयीला खूप नुकसानही सहन करावं लागलं. पण भाऊ आणि त्याच्या पत्नीनं आपल्या मुलीला खंबीर आधार दिला.

मृणमयी याविषयी म्हणाली,'वडीलांनी माझ्यावर विश्वास दाखवत व्यवसायात पैसा गुंतवला. त्यासाठी ममता कदम तुमचे धन्यवाद. जेव्हा कधी मी शार्क टॅंकमध्ये जाईन तेव्हा आपण दोघी एकत्र जाऊ''.

हेही वाचा: अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

Bhau Kadam,  mrunmayee kadam
Vanita Kharat: 'हास्यजत्रे'च्या मंचावर गौरव मोरेच 'या'बाबतीत मास्टर..' वनिता खरातनं सांगितलं सीक्रेट

''माझी आई माझा मोठा पाठिंबा आहे. तिच्याशिवाय 'तारुंध्य'चं स्वप्न पाहणं शक्यच झालं नसतं. माझ्या काकानं देखील मला पावलोपावली मदत केली. त्यानं मला खूप प्रेरणा दिली...'' अशी एकंदरीत पोस्ट करत मृणमयीनं सगळ्यांचे आभार मानले आहेत.

मृणमयी आपल्या व्यवसायात आता बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाली आहे. भाऊ कदम याच्या पत्नीनं आपल्या मुलीच्या ब्रॅंडसाठी खास फोटोशूटही केलं आहे. आता मृणमयीचे प्रयत्न आपल्या व्यवसायाला शार्क टॅंकमध्ये नेण्यासाठी आहेता याचे संकेतही तिनं या पोस्टमधून दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()