Bheed Movie : भीडच्या ट्रेलरमधून मोदींचं भाषण का हटवलं? अनुभवनं सांगितलं कारण

भीडच्या ट्रेलरची तुलना लॉकड़ाऊन २०२० बरोबर करण्यात आल्यानं वेगळ्याच चर्चेला उधाण आल्याचे दिसून आले आहे.
Bheed Movie Trailer PM Narendra Modi Voice remove
Bheed Movie Trailer PM Narendra Modi Voice remove esakal
Updated on

Bheed Movie Trailer PM Narendra Modi Voice remove : बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुभव सिन्हा हे त्यांच्या आगळ्या वेगळ्या प्रयोगशील चित्रपटांमुळे लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्या चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. गेल्या काही दिवसांपासून ते चर्चेत आले आहे.

अनुभव सिन्हा यांचा बहुचर्चित असा भीड नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित होताच त्याला नेटकऱ्यांचा, चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या दोन वर्षामध्ये देशाला कोणत्या संकटांचा सामना करावा लागला या विषयावर आधारित चित्रपटाच्या ट्रेलरनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या ट्रेलरमुळे वेगळ्याच वादाला सुरुवातही झाली होती.

Also Read - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

सोशल मीडियावरुन तो ट्रेलर हटविण्यात आल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. राजकुमार राव, भूमी पेडणेकर, दीया मिर्झा, पंकज कपूर यांच्या सारखी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या भीड चित्रपटाला आता राजकीय रंग येत चालल्याचे दिसून आले आहे. त्या ट्रेलरच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज होता तो आता काढण्यात आला आहे.

भीडच्या ट्रेलरची तुलना लॉकड़ाऊन २०२० बरोबर करण्यात आल्यानं वेगळ्याच चर्चेला उधाण आल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे हा चित्रपट राजकीय कात्रीत सापडला आहे. आता ट्रेलरमध्ये काही बदल करुन तो पुन्हा शेयर करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान दिग्दर्शक अनुभव सिन्हा यासगळ्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.

Bheed Movie Trailer PM Narendra Modi Voice remove
'आज रात 12 बजे से...', 'Bheed'चा ट्रेलर पाहून अंगावर येईल काटा

अनुभव सिन्हा म्हणाले की, इतर चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटाच्या वेळी मला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागला आहे. जसं की मला थप्पड या चित्रपटामध्ये प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम यांच्या कवितेचा समावेश करायचा होता. पण तो काही करता आला नाही. मला भीडविषयी सांगायचे झाल्यास लोकांना मला वेगळी गोष्ट सांगायची आहे. ती अधिक रंजक आहे.

Bheed Movie Trailer PM Narendra Modi Voice remove
Shah Rukh Khan: कोण आहे हा 'छोटा पठाण' ज्याचं शाहरुखने केलं कौतुक, पाहा व्हिडिओ

प्रेक्षकांना मला सांगायचे आहे की, सोशल मीडियावर जे काही बोलले जात आहे त्यावर विश्वास ठेवू नका. गावात जशी पानाच्या दुकानावर माणसं जमा होतात तशी त्या ट्विटवर गोळा होतात. मस्क सारखी माणसंही कधी कधी वेड्यासारखं बोलून जातात पण ती हुशार आहेत. अशा शब्दांत सिन्हा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()