भोंगा (bhonga) हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) त्यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत भाष्य केले. त्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण प्राप्त झाले. मुस्लिम वर्गाकडून या निर्णयाला मोठा विरोध झाला. शिवाय विरोधी पक्षांकडूनही चिकलफेख करण्यात आली. अशातच 'भोंगा' या चित्रपटाचे पोस्टर आले आणि हे प्रकरण अधिकच रंगले. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आउट झाला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'भोंगा' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये अत्यंत मार्मिक भाष्य केलेले आहे. यावरून चित्रपटाचा विषय आणि आशय स्पष्ट होतो. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे. येत्या ३ मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'आमच्यावेळी धर्म घरात होता आणि बाहेर सगळी माणसं एक होती. आता धर्म आधी येतो आणि मग माणसं' या वाक्याने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले आहे.
एका इस्लाम धर्मीय बाळाला होणाऱ्या आवाजाच्या त्रासामुले भोंगा बंद करण्याचा प्रस्ताव पुढे येतो. परंतु त्यातून कशा पद्धतीने जातीय तेढ निर्माण होऊ भोंगा' हा माणसापेक्षा मोठा बनतो यावर ट्रेलर मधून भाष्य केले आहे. शिवाय 'अजान देणं धर्माचं काम हाय, पण ती भोंग्यातूनच दिली पाहिजे असं कुठं लिव्हलंय का..' असा प्रश्न या माध्यमातून विचारला गेला आहे. 'भोंगा ही धार्मिक नाही तर सामाजिक समस्या आहे' असे बिरुद या चित्रपटाचे आहे.
‘भोंगा’ या चित्रपटाची कथा ही अजानवर भाष्य करणारी आहे. एका कुटुंबातील नऊ महिन्याच्या बाळाला Hypoxic Ischemic Encephalopathy हा गंभीर आजार झालेला असतो. अजानच्या भोंग्यामुळे या बाळाच्या तब्येतीवर दिवसेंदिवस परिणाम होतो. बाळाला होणारा त्रास संपूर्ण गाव पाहत असतो. पण हे थांबवण्यासाठी नेमकं काय काय करावं लागतं ते या चित्रपटातून दिसेलच. चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील (shivaji lotan patil) यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.