Bhushan Kumar T serise Owner Relief from Magistrate Court : टी सीरिजचे मालक भुषण कुमार यांच्याविषयीची एक मोठी बातमी आता समोर आली आहे. त्यांना मुंबईतील मॅजिस्ट्रेट कोर्टानं दिलासा दिला आहे. मुंबई पोलिसांकडून जो रिपोर्ट सादर करण्यात आला होता त्यानुसार भुषण कुमार यांच्याविरोधात बलात्कार आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल होणार होता.
आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोर्टानं हे आरोप फेटाळून लावत कुमार यांना दिलासा दिला आहे. अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टानं ९ नोव्हेंबर रोजी पोलिसांकडून तो रिपोर्ट स्विकारला होता. जो बी समरी रिपोर्ट होता. बी समरी रिपोर्ट तेव्हा दिला जेव्हा पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा ठोस पुरावा सादर केला जात नाही अथवा संबंधित प्रकरणाची गंभीरतेनं नोंद घेतली जात नाही, तसेच तपास केल्यानंतर आरोपीच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा न सापडल्यास त्याच्याविरोधात केस तयार होत नसल्यास....
राजस्थान निवडणुकीत महिला, सिलेंडर आणि जातीय मुद्दा.! (Rajasthan Assembly Election 2023 )
डीएन नगर पोलीस ठाण्यात जुलै २०२१ मध्ये भुषणच्या विरोधात बलात्कार आणि फसवणूकीचा गुन्हा भारतीय दंड संहितेनुसार दाखल करण्यात आला होता. त्या तक्रारीनुसार भुषणनं त्याच्या कंपनीमध्ये एका महिलेला नोकरी देण्याचा निमित्तानं अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.
यानंतर पोलिसांनी एक बी समरी रिपोर्ट दाखल केला होता. त्यात याचिकाकर्त्याच्या तक्रारीची दखल तो मॅजिस्ट्रेट कोर्टानं फेटाळून लावला होता. पीडितेनं म्हटलं होतं की, आपण परिस्थिती आणि गैरसमजूतीतून त्यांच्यावर चुकीचे आरोप केले होते. आणि आता आपण आपले आरोप पुन्हा मागे घेत आहे. फिर्यादीनं बी समरी रिपोर्टमध्ये कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नव्हता.
२०२३ मध्ये पोलिसांनी पुन्हा एकदा बी समरी रिपोर्ट दाखल केला आहे. तो मॅजिस्ट्रेट कोर्टानं स्विकार केला आहे. त्यात भुषण कुमारनं सहमतीनं एफआयआरला रद्द करण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. भुषणच्या वतीनं वकील निरंजन मुंदारगी आणि चंदन सिंह शेखावत यांनी बाजू मांडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.