Bigg Boss 16 : हिंदी बिग बॉस गोत्यात! जातीवाचक टिप्पणीमुळं SC आयोगाची निर्मात्यांना नोटीस

bigg boss 16 NCSC issued notice to Viacom 18 Media Endemol India Mumbai CP over casteist remark
bigg boss 16 NCSC issued notice to Viacom 18 Media Endemol India Mumbai CP over casteist remark
Updated on

लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) अडचणीत सापडला असून या लोकप्रिय शोमधील एका स्पर्धकांनी केलेल्या जातीवाचक टिप्पणीबद्दल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (National Commission for Scheduled Castes) ने शोच्या निर्मात्यांना नोटीस जारी केली आहे.

यासोबतच आयोगाने कलर्स टीव्ही, एंडेमोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Endemol India Pvt Ltd), वायाकॉम18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासह माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव आणि मुंबईच्या पोलिस आयुक्तांना ही नोटीस जारी करण्यात आली आहे. 28 डिसेंबर रोजी प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबाबत ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

bigg boss 16 NCSC issued notice to Viacom 18 Media Endemol India Mumbai CP over casteist remark
Devendra Fadnavis : तर तुम्ही माझं लग्न थांबवलं असतं ना…; विदर्भाच्या मुद्यावर फडणवीस-खडसेंमध्ये जुंपली
bigg boss 16 NCSC issued notice to Viacom 18 Media Endemol India Mumbai CP over casteist remark
मोठी बातमी! राज्यातील शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर

NCSC ने माहिती दिली की आयोगाने सोशल मीडियाद्वारे प्राप्त झालेल्या व्हिडिओची स्वतःहून दखल घेतली आहे, ज्यामध्ये विकास मनकतला (Vikas Manaktala) ही महिला स्पर्धक अर्चना गौतमला खालच्या जातीची व्यक्ती म्हणून संबोधित करत आहे. आयोगाने म्हटले आहे की एससी/एसटी कायद्यांतर्गत हा दंडनीय गुन्हा आहे, ज्याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

bigg boss 16 NCSC issued notice to Viacom 18 Media Endemol India Mumbai CP over casteist remark
Cobra Viral Video : किंग कोब्रावर झाडल्या गोळ्या अन् नागराजाने गेमच केला

आयोगाने कलर्स टीव्ही आणि शोच्या निर्मात्यांना या प्रकरणी 7 दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. यामध्ये घटनेची तारीख, तपशील, काय कारवाई केली यासह अन्य माहिती देण्याबद्दल सांगण्यात आले आहे. अहवाल वेळेवर न दिल्यास पुढील कारवाई केली जाईल, असेही आयोगाने बजावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.