चित्रपट निर्माता साजिद खान सध्या बिग बॉस 16 मध्ये दिसत आहेत. शोमध्ये त्याची एन्ट्री वादात सापडली आहे. MeToo या मोहिमेअंतर्गत त्याच्या विरोधात तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत. साजिद खानला बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून संधी दिल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला जात आहे.
त्याच मोहिमेच्या अग्रस्थानी असलेली अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राने MeToo आरोपी साजिद खानविरोधात तक्रार दाखल केली आहे. आता तिने महिला पोलीस अधिकाऱ्यासमोर तिचा जबाब नोंदवला आहे. इतकचं नाही तर तिने सलमान खानलाही आवाहन केले आहे.
शर्लिनने काल जुहू पोलीस स्टेशनमध्ये तिचा जबाब नोंदवण्यासाठी पोहोचली मात्र, पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवण्यास स्पष्ट नकार दिला.
एएनआयशी बोलतांना ती म्हणाली, 'मला सांगण्यात आले आहे की, ज्या पोलीस अधिकाऱ्याकडे माझी केस सोपवण्यात आली आहे, तो उपस्थित नाही. मी त्यांना विनंती केली की मला महिला अधिकाऱ्यासमोर जबाब नोंदवायचा आहे. पण मला सांगण्यात आले. जुहू पीएसआयमध्ये एकही महिला पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित नाही. मला धक्काच बसला. त्यामुळे आता मी पीएसआय महिला पोलीस अधिकारी मेघा यांच्याकडे माझे म्हणणे नोंदवले आहे. ते MeToo आरोपी साजिद खानला मोठी मदत करतील, असे आश्वासनही त्यांनी दिले असल्याचे तिने म्हटले आहे. बॉसच्या घरात चौकशीसाठी बोलावणार.असा गुन्हेगार बिग बॉसच्या घरात असणे दुर्दैवी आहे.आम्हाला न्याय हवा असल्याने कारवाई झाली पाहिजे'.
यावेळी ती सलमानवरही भडकल्याचे दिसले. सलमान आमची भूमिका का घेऊ शकत नाही असा प्रश्न तिने सलमानला विचारला. तसेच ती म्हणाली जो आपल्या मित्राने अन्याय केलेल्या महिलांच्या दुर्दशेकडे अगदी सहज दुर्लक्ष करतो. लोक तुम्हाला भाईजान म्हणतात, तु आमच्या बाजूने भूमिका का घेऊ शकत नाही? तू आमच्यासाठी मोठा भाऊ का होऊ शकत नाहीस? मोलेस्टर, हैबिचुअल ऑफेंडरला तुम्ही तुमच्या घरातून का काढू शकत नाही. आमच्यासाठी ही उदासीनता का? आम्ही सलमान खानच्या घराबाहेर मूकपणे आंदोलन करणार आहोत. आम्ही त्याला 'भाईजान' सारखे वागवतो म्हणून आमच्याबद्दल थोडी सहानुभूती त्याने दाखवावी अशी आम्ही विनंती करतो
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.