मुंबई - बिग बॉसचं 14 (bigg boss) वं पर्व संपलं. तोच त्याच्या पुढील भागाची चर्चा सुरु झाली. गेल्या पर्वाला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी त्यातील कित्येक भागांची चर्चाही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. बिग बॉस हा काही वादाशिवाय होऊ शकत नाही. असं समीकरण प्रेक्षकांच्या मनात घट्ट रुतून बसलं आहे. आतापर्यत (bollywood celebrity) काही सेलिब्रेटीही त्या शो चा भाग झाले आहे. अशाच एका अभिनेत्रीलाही यावेळी या शो मध्ये सहभागी होण्याबद्दल विचारले होते. (bigg boss 15 bhumika chawla denied to participate in salman khan tv reality show )
प्रेक्षकांना आता बिग बॉसच्या 15 व्या सीझनचे वेध (bigg boss season 15) लागले आहेत. त्यात कोण स्पर्धक सहभागी होणार याविषयी उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. बिग बॉस जेव्हा नियमितपणे सुरु होते त्यावेळी त्याच्या टीआरपीमध्ये (Trp) कमालीची वाढ झाल्याचे दिसून येते. याचा प्रत्यय प्रेक्षकांनी घेतला आहे. केवळ सर्वसामान्य प्रेक्षक त्याचा भाग असतात असे नाही तर बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनाही त्या शो चा भाग व्हायला आवडते. असे दिसून आले आहे.
बॉलीवूडचा भाईजान सलमान खान (salman khan) याच्या बरोबर तेरे नाम या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री म्हणून भूमिका चावला (bhumika chawala) प्रसिध्द आहे. तिला बॉलीवूडमध्ये इतर अभिनेत्रींच्या तुलनेत ग्लॅमर कमी मिळाले. मात्र ती सोशल मीडियावर चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. तिला ज्यावेळी बिग बॉसमध्ये सहभागी व्हायला आवडेल का, असे विचारण्यात आले त्यावेळी तिनं दिलेलं उत्तर धक्कादायक होते.
आता भूमिकानं आपल्याला वारंवार विचारल्या जाणा-या प्रश्नावर सोशल मीडियावर उत्तर लिहिलं आहे. त्यात तिनं म्हटलं आहे की, मला या कार्यक्रमाचा भाग व्हायचं नाही. मला त्या कार्यक्रमात सहभागी व्हायला सांगितलं तरी मी होणार नाही. मला माझं आयुष्य आणि त्यातील खासगीपण जपायचे आहे. यापुढे मला ऑफर आली तरीही मी त्या कार्यक्रमात काम करणार नाही. असं भूमिकानं म्हटलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.