Shiv Thakare News: बिग बॉस १६ चा उपविजेता शिव ठाकरेचं बिग बॉसमुळे फॅन फॉलोईंग प्रचंड वाढलंय. शिव ठाकरे सध्या यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. परंतु त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत याचा अनुभव नुकताच आला.
विरल भयानी यांनी शिव ठाकरेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केलाय. या व्हिडिओत शिव ठाकरेचा अगदी साधासुधा अंदाज पाहून चाहते त्याच्या प्रेमात पडले आहेत.
(bigg boss 16 runner up Shiv Thakare's journey in Mumbai by rickshaw)
शिव मुंबईच्या रस्त्यावर मनसोक्त भटकताना दिसला. त्यावेळी रस्त्यावरचे अनेक सामान्य नागरिक शिवला भेटायला आले. शिवने सर्वांसोबत मजेत वेळ घालवला. एक छोटा मुलगा बाजूला उभा होता. त्याच्यासोबत 'क्या रे छोटे' असं म्हणत शिवने मस्करी केली.
याशिवाय 'आपली मुंबइची रिक्षा' असं म्हणत शिव आनंदात रिक्षात बसला आणि त्याने रिक्षावाल्यासोबत सुद्धा खास फोटो काढला. खुद्द शिव ठाकरे रिक्षात बसल्याने रिक्षावाला सुद्धा खुश झालेला. शिव ठाकरेने सर्व फॅन्सना प्रेमाने भेटत सर्वांशी हसऱ्या चेहऱ्याने फोटो काढला
बिग बॉसच्या १६ व्या सीझनमध्ये सलमाननं एमसी स्टॅनच्या नावाची घोषणा केली आणि शिवचे डोळे भरुन आले.
विजेतेपद जाहीर करण्यापूर्वी या दोन्ही मंडलींनी निकाल काहीही असो जिंकणारा व्यक्ती हा मंडलीचा असणार आहे याचा त्यांना विशेष आनंद होता. शिवला बिग बॉस १६ मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं
बिग बॉस १६ मध्ये प्रियंका आणि शिव ठाकरे यांच्यात चुरस असेल असं बऱ्याचजणांचा वाटत होतं. मात्र एमसी स्टॅन जिंकल्याने प्रेक्षकांना मोठा धक्काच बसला होता. शिव आणि एमसी स्टॅन हे अंतिम दोन स्पर्धक होते.
त्यात सलमाननं स्टॅनच्या नावाची घोषणा देखील केली. शिव ठाकरेला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं तरी तो त्याच्या प्रवासाबद्दल समाधानी आहे.
एमसी स्टॅन जिंकल्यावर सोशल मीडियावर शिवनं पोस्ट केली. शिव म्हणतो, अखेर आपण जिंकलो. याचा मला खूप आनंद आहे.
विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. शिव काल त्याच्या इंस्टग्राम वर लाईव्ह आला होता. त्याने त्याच्या फॅन्सशी संवाद साधला
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.