Bigg Boss 16 : बिग बॉसमध्ये पहिले भांडण; स्पर्धकांमध्ये तू तू-मैं मैं सुरू

बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतरच स्पर्धकांमध्ये तू तू-मैं मैं सुरू झाली
Bigg Boss Latest News
Bigg Boss Latest NewsBigg Boss Latest News
Updated on

Bigg Boss Latest News बिग बॉस १६ चा प्रवास सुरू झाला आहे. शोचा पहिला भाग १ ऑक्टोबर रोजी प्रसारित झाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या चेहऱ्यांपासून ते टीव्ही आणि सिने जगतातील सेलिब्रिटी या शोचा भाग आहेत. बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतरच स्पर्धकांमध्ये तू तू-मैं मैं सुरू झाली आहे. या सीझनची पहिली लढत बेडवरून झाली.

बिग बॉसच्या घरात प्रवेश करणारी स्पर्धक निमृत कौर अहलुवालिया हिला बिग बॉसने कॅप्टन बनवले. तसेच घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला बेड आणि इतर गोष्टींचे वाटप करण्याची जबाबदारी दिली. निमृतने स्पर्धक अर्चना गौतमला आरशासमोरचा बेड दिला. नंतर अर्चनाला बेड बदलण्यास सांगितले. याच मुद्द्यावरून अर्चनाची बिग बॉसची कॅप्टन निमृत कौरशी भांडण झाले.

Bigg Boss Latest News
Anaya Soni : टीव्ही अभिनेत्री अनाया सोनीची प्रकृती चिंताजनक; किडनी निकामी

अर्चनाने निमृतला बेड बदलण्याचे कारण विचारते. जेव्हा अर्चनाने तिला सांगितले की काही स्पर्धकांकडे अनेक बॅग आहेत, त्यांना बॅग ठेवण्यास सोयीस्कर होईल, तेव्हा अर्चना सरळ गेली आणि कॅमेराकडे ओरडायला लागली. मी खूप बॅग आणल्या आहेत. बिग बॉसने बॅग आत का ठेवल्या नाहीत?

बिग बॉसच्या घरात आलेल्या बाकीच्या सेलिब्रिटींनी अर्चनाला समजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अर्चनाने थेट त्यांच्याशीच भांडण केले. अर्चना म्हणाली, सगळे वेडे झालेत का? तुम्ही सगळे माझ्यावर का चढत आहात? तुम्हाला हे का समजत नाही की मला आरसा जवळच्या बेडची गरज आहे. कारण, मला सकाळी प्रथम स्वतःला पहायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.