Bigg Boss 17: या स्पर्धकाचा खेळ खल्लास! बिग बॉसच्या घरातुन ही स्पर्धक गेली घराबाहेर

बिग बॉस 17 मधुन ही स्पर्धक गेली घराबाहेर
Bigg Boss 17 Eviction Interview Manasvi Mamgai evicted from bigg boss 17 salman khan
Bigg Boss 17 Eviction Interview Manasvi Mamgai evicted from bigg boss 17 salman khanSAKAL
Updated on

Bigg Boss 17 Elimination News: बिग बॉस 17 ची सध्या खुप चर्चा आहे. कुठे प्रेमप्रकरणं, कुठे वादविवाद अशा अनेक गोष्टींमुळे बिग बॉस 17 शोची सध्या खुप चर्चा आहे. अशातच बिग बॉस 17 मध्ये एलिमिनेशन पार पडलंय.

बिग बॉस 17 मधुन मनस्वी ममगईला घरातुन बाहेर जावं लागलंय. प्रेक्षकांच्या कमी मतांंमुळे ममगईचा बिग बॉस 17 मधला प्रवास संपलाय.

Bigg Boss 17 Eviction Interview Manasvi Mamgai evicted from bigg boss 17 salman khan
#AskSRK च्या प्रश्नांना शाहरुख स्वतःच उत्तरं देतो की त्याची टीम? किंग खाननेच केला आश्चर्यकारक खुलासा

या आठवड्यात मनस्वी, समर्थ, ईशा, मनस्वी, अरुण आणि सना हे सदस्य बाहेर जाण्यासाठी Nominated होते. मनस्वी ममगाईने गेल्या आठवड्यात घरात प्रवेश केला आणि पहिल्या आठवड्यातच तिला घरातून बाहेर काढण्यात आले.

मनस्वी ही घरातील वाईल्ड कार्ड स्पर्धक होती. मात्र, लोकांना तिचा खेळ आवडला नाही, त्यामुळे तिला कमी मते मिळाली आणि अभिनेत्रीला बाहेर जावे लागले.

त्याचवेळी सना खान पुन्हा एकदा बेघर होण्यापासून बचावली. गेल्या आठवड्यातही तिला घराबाहेर जाण्याचा धोका होता.

या आठवड्यात मनस्वीने बिग बॉसच्या नियमांचेही उल्लंघन केले होते. तिने तिच्या लाल लिपस्टिकने वॉशरूमच्या आरशावर "अनुराग एक देशद्रोही आहे" असे लिहिले होते. हे पाहताच तिच्या या कृतीवर बिग बॉस संतापले.

त्याचे गंभीर परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील, असे बिग बॉसने जाहीर केले होते. मनस्वीच्या या वागण्यामुळे घरातील लोकही मनस्वीवर प्रचंड नाराज झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()