गृहखाते झोपेच्या गोळ्या घेऊन झोपलंय का? बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले भडकले...

Abhijit Bichukale
Abhijit Bichukale Esakal
Updated on

Abhijit Bichukale News: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराचं वातावरण फार बदललं आहे. दिवसाढवळ्या अनेक गुन्हे शहरात घडत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपुर्वी पुण्यातुन दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती.

या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोंढवा भागात काहींनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

याप्रकरणी तपास सुरु असून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं. त्यात अकबर नदफ आणि तौकीर या दोन आरोपींचे नाव समोर आले आहे.

Abhijit Bichukale
Urfi Javed Death Threat: लवकरच तुला गोळ्या घालू! उर्फीला मिळाली जीवे मारण्याची धमकी! तिने दिला असा रिप्लाय

आयपीसी 153 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा परिसरात एका शाळेचे बांधकाम सुरु आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही व्यक्ती बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होते. आता या प्रकरणावर बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले यांनी देखील संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.

Abhijit Bichukale
Nick Jonas Video Viral: लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान स्टेजवर कोसळला प्रियंकाचा नवरा निक जोनस! पुढं काय घडलं पहा

बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धीस आलेले अभिजित बिचुकले नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असतात.

त्यातच आता या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, 'पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात अशा प्रकारचे पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणे हे मूळीच खपवून घेतलं जाणार नाही.

यावेळी गृहमंत्र्यावर टिका करत ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गृहखातं काय करत आहे ते झोपेच्या गोळ्या घेऊन झोपलंय का?

पुढे ते म्हणतात की, शासनाने त्यांना लेखी पत्र द्यावं त्यानंतर ते स्वत: त्यांचा शोध घेतील आणि त्यांना फासावर लटकवतील. आता त्याच्या या विधानाची चर्चा सुरु झाली आहे.

Abhijit Bichukale
Gadar 2 Box Office Collection Day 6: 65 वर्षाचा सनी सगळ्यांवर पडला भारी! गदर2 च्या कमाईला ब्रेक नाहीच...

कोंढवा परिसरात १४ तारखेला सोमवारी रात्री हा प्रकार घडला होता. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याने नागरिकांनाही धक्का बसला होता. हा प्रकार समोर येताच कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

त्यातच एका युक्रेरियन गायक उमा शंकर हिने देखील राष्ट्रध्वज तिंरग्याचा अपमान केला होता तिचा व्हिडिओ देखील सोशल मीडिया व्हायरल झाला होता. तिच्यासोबत आणखी एकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता पोलिस पुढिल तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.