Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठी ३ चा खेळ हा दिवसेंदिवस रंजक होत आहे. गेल्या आठवड्यात नॉमिनेशनमध्ये आलेल्या सदस्यांपैकी मीनल आणि विशाल सेफ झाले. जय, सोनाली आणि तृप्ती देसाई या तीन जणांमधून कोणाला घराबाहेर जावं लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. जय दुधाणे आणि तृप्ती देसाई Trupti Desai हे दोन सदस्य डेंजर झोनमध्ये आले आणि त्यापैकी तृप्ती देसाई यांना बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावं लागलं. तृप्ती देसाई घराबाहेर जाणार हे कळताच इतर सदस्यांना अश्रू अनावर झाले. घराबाहेर पडल्यानंतर तृप्ती देसाईंनी महेश मांजरेकरांशी बोलताना लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
बिग बॉस मराठी ३च्या घरामधील सदस्यांना कलर्स मराठी परिवरातील सदस्य भेटायला गेले. जीव माझा गुंतला मालिकेतील अंतरा आणि मल्हार यांनी घरातील सदस्यांसोबत धमाल केली. मीरा – जय, विशाल – मीरा आणि दादूस – मीनल – नीथा यांनी एकापेक्षा एक दमदार परफॉर्मन्स दिले. तर, विशाल आणि सौरभ यांनी त्यांच्या काही आठवणी शेअर केल्या. घरातील सदस्यांचे त्यांनी कौतुकदेखील केले. याचसोबत सदस्यांना त्यांच्या घरून आलेले गिफ्ट्स मिळाल्याने दिवाळीचा हा आनंद द्विगुणित झाला. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या चाहत्यांची चुगली ही चुगली बूथद्वारे स्नेहा, विशाल यांना सांगितली. विकास, जय आणि विशाल यांनी बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली.
तृप्ती देसाई बिग बॉसच्या घरात जवळपास ५० दिवस होत्या. हा प्रवास कसा होता याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, "५० दिवसांचा प्रवास फारच मोठा होता. पण बिग बॉसच्या घराबद्दल लोकांमध्ये बरेच गैरसमज आहेत. त्याउलट हे घर खूपच छान आहे. आतापर्यंत मी सामाजिक काम करत होते. पण आता मी लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहे."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.