Bigg Boss Marathi 4: अपूर्वा-प्रसाद मधली ठसन माहीत आहे का? एकेकाळी होते जानी दुश्मन

प्रसादने एकेकाळी अपूर्वाला कमी लेखून तिला हिणवले होते, हे किस्से तिने बिग बॉस मध्ये सांगितले आहेत.
Bigg Boss Marathi 4 apurva nemlekar reveals secrets of prasad jawade her conflict
Bigg Boss Marathi 4 apurva nemlekar reveals secrets of prasad jawade her conflict sakal
Updated on

bigg boss marathi 4: बिग बॉस मराठी'चा खेळ म्हणजे टास्क, वाद, भांडण आणि राडे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला सुरुवात होऊन 15 दिवस उलटले असून आता खरी मजा घेऊ लागली आहे. कोण आपल्यावर गेम करतंय, कोण मनापासून साथ देतय याची प्रचिती स्पर्धकांना येऊ लागली आहे. पण काही सडस्यांमध्ये सुरुवाती पासूनच तनाव पाहायला मिळत आहे. ते म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे. अगदी पहिल्या दिवसापासूनच त्यांच्यामध्ये खुन्नस पाहायला मिळत आहे. सध्या दोघेही एकमेकांशी जुळवून घेत असले तरी त्या खुन्नस मागे नेमकं काय कारण आहे, ते अपूर्वाने बिग -बॉस मध्ये उघड केलं आहे.

(Bigg Boss Marathi 4 apurva nemlekar reveals secrets of prasad jawade her conflict )

Bigg Boss Marathi 4 apurva nemlekar reveals secrets of prasad jawade her conflict
Bigg Boss Marathi 4: विकास थंड घे! अपूर्वा नेमळेकर एवढी स्वस्त झालेली नाहीय..

अपूर्वा आणि प्रसाद अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. असे असूनही पहिल्या दिवसापासून (bigg boss marathi) त्यांच्यात संघर्षाचे वातावरण आहे. ते असण्यामागे ही एक महत्वाचं कारण आहे. एकवेळ अशी होती की प्रसाद अपूर्वाला अत्यंत चुकीची वागणूक देत होता. याबाबत अपूर्वाने घरात मोठा खुलासा केला आहे. अपूर्वा म्हणाली, 'पहिल्याच दिवशी प्रसादला पाहून माझी सटकली होती. माझ्या पहिल्या मालिकेच्या ऑडिशनसाठी मी गेले होते. तेव्हा तो सेट प्रसादचा होता. तेव्हा मला तिथे बघून त्यानं तोंड वाकडं केलं होतं. पण मी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं.'

Bigg Boss Marathi 4 apurva nemlekar reveals secrets of prasad jawade her conflict
Om Raut: बाबो! 'आदिपुरुष'चा दिग्दर्शक ओम राऊतला आलं 4 कोटीचं गिफ्ट.. काय आहे असं?

ती (apurva nemlekar) पुढे म्हणाली, 'मला कोणतंही बॅकग्राउंड नसताना मला मालिका मिळाली आणि ती मालिका जवळपास दीड वर्ष चालली. मालिका संपली आणि त्यानंतर प्रसाद आणि माझी एका सिनेमाच्या सेटवर पुन्हा भेट झाली. तेव्हा मी सेटवर लाइट मेकअप करून गेले होते. माझा रोमँटिक सीन शिवाजी पार्कच्या चौपाटीवर शुट होणार होता. माझ्याकडे पाहून प्रसादला वाटलं की ही अशीच आली आहे. त्या सिनेमाच्या सेटवर मी एका फिमेल डिरेक्टर बरोबर उभी होती. तेव्हा प्रसाद तिथे आला आणि मला म्हणाला की, 'काय एक सिरीयल करून संपलं का?.. आता लग्न करायचं आणि नवरा पोरांना घेऊन 7.30 वाजता माझी सिरीयल बघायची.'

' त्यावेळी मी फक्त त्याच्याकडे बघितलं आणि काहीच बोलले नाही. कारण त्याची मालिका ज्या 7.30 च्या स्लॉटला आहे त्याच स्लॉटला त्याच्या अपोझिट पंधरा दिवसांनी माझी सिरियल लागणार आहे आणि त्यात मी लीड रोल करतेय हे त्याला माहिती नव्हतं. त्याच्या स्लॉटला माझी मालिका लागणार ही जेव्हा मला कळलं तेव्हा मीच त्याला कॉल केला आणि म्हंटलं, 'तुझं आता वाइन्ड अप होईल त्यामुळे आता लग्न कर आणि बायका पोरांना घेऊन 7.30च्या स्लॉटला माझी मालिका बघ.' असा किस्सा अपूर्वाने सांगितला. तिचा हा किस्सा सध्या बराच चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.