bigg boss marathi S 4: यंदा बिग बॉसच्या घरातले तिसरे एलिमिनेशन. या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कालच बिग बॉसच्या घरातील चौथी चावडी पार पडली. यावेळी मांजरेकरांनी एकेकाची चांगलीच खरडपट्टी काढली. आता आज कोण जाणार याची उत्कंठा सर्वांना लागली आहे.
Bigg Boss Marathi 4 third elimination yogesh jadhav amruta deshmukh kiran mane trishul marathe vikas sawant
सध्या बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवा ट्विस्ट येत आहे. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होऊन आता तीन आठवडे झाले आहेत. घरामध्ये रोज नवीन वाद, नवा राडा होत आहे. आठवड्यात स्पर्धकांनी कितीही राडा घातला तरी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात ती शनिवार आणि रविवारची. म्हणजे बिग बॉसच्या चावडीची. महेश मांजरेकर सदस्यांची कशी शाळा लावतात हे पाहण्यासाठी सारेच उत्सुक असतात. काल बिग बॉस च्या घराची चौथी चावडी पार पडली. यावेळी महेश मांजरेकर यांनी सर्वांचीच कानउघडणी केली.
पण किरण मानेला विशेष दणका दिला. गेल्या आठवड्यात किरण मने याने थेट महेश मांजरेकर यांच्यावर टीका केली होती. ते कुणाला काम देतात, कुणाला ठरवून ओरडतात शिवाय इतर स्पर्धक कशासाठी आले आहेत, त्यांची लायकी काय आहे यावर त्याने चर्चा केली होती. या सगळ्याचा हिशोब मांजरेकरांनी चावडीच्या सुरवातीलाच चुकता केला. किरण मानेला थेट बॅग उचलून घराबाहेर काढण्याची ताकीद त्यांनी दिली. सोबत आज कोण बाहेर जाणार याविषयी त्यांनी काही संकेत दिले.
या आठवड्यात प्रसाद जवादे, अमृता देशमुख, विकास सावंत, किरण माने, योगेश जाधव , त्रिशूल मराठे ही सह स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. त्यापैकी प्रसाद जवादे सेफ असल्याचे कालच्या भागात महेश सरांनी सांगितले. पण आता पाच सदस्यांपैकी कोण आज घरचा निरोप घेणार याची उत्कंठा लागली आहे. काल मांजरेकरांनी संकेत दिल्यानुसार अमृता देशमुख सेफ असेल असे दिसते आहे. त्यामुळे विकास सावंत, किरण माने, योगेश जाधव , त्रिशूल मराठेयांच्यापैकी एकजण घराबाहेर जाईल असे चित्र आहे. तेव्हा आज कळले नेमकं कोण होणार घराबाहेर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.