bigg boss marathi 4 : 'बिग बॉस मराठी'चा खेळ म्हणजे टास्क, वाद, भांडण आणि राडे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला सुरुवात होऊन दोन आठवडे उलटले असून आता खरी मजा घेऊ लागली आहे. कोण आपल्यावर गेम करतंय, कोण मनापासून साथ देतय याची प्रचिती स्पर्धकांना येऊ लागली आहे. आता तिसऱ्या आठवड्यात कोण कॅप्टन होणार याचे वेध सर्वांना लागले आहे. त्यासाठी एक भन्नाट कॅप्टीन्सी कार्य बिग बॉस ने सर्वांना दिले आहे. या टास्कच्या दरम्यान पण खूप राडा होणार आहे. याच कार्यादरम्यान अपूर्वा नेमलेकर दोन स्पर्धकांविषयी काही कमेंट करताना दिसणार आहे.
बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर "वाजवा रे वाजवा" हे कॅप्टन्सी कार्य सोपवले आहे. अपूर्वा आणि तेजस्विनी मध्ये हे कार्य पार पडणार असून कोण बनणार घराचा नवा कॅप्टन हे आज कळेलच. पण, दोन्ही ग्रुप मधील सदस्य भन्नाट स्ट्रॅटेजि आणि प्लॅनिंग करताना दिसत आहेत. या कॅप्टनसी कार्यामध्ये कोण कोणाची वाजवणार? हे पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत.
अपूर्वा नि तेजस्विनी मध्ये कोण कोणाला मागे टाकून बनेल घराची नवी कॅप्टन हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. अपूर्वा त्रिशूलला सांगताना दिसणार आहे, 'त्यांनी सगळं उचललं असेल आणि फेकलं असेल शक्तीच्या बळावर. पण युक्ती देखील लागते जी त्यांच्याकडे नाहीये. मेघाचे म्हणणे आहे, आपली कॉपी करायला गेले, तुम्हांला का नाही सुचतं आधी...' त्यावर अपूर्वाचे म्हणाली. आपली कॉपी करायला गेले गंडले कारण प्लॅन माहितीच नाहीये.'
तर दुसऱ्या टीम मध्ये तेजस्विनी टीमला सांगताना दिसणार आहे, 'मेघा ताई ज्या रित्या भांडतात काही बघतच नाही त्या.' तर या टास्क दरम्यान अक्षय, समृद्धी आणि अपूर्वामध्ये चर्चा रंगली असून चर्चा सुरु आहे अमृता धोंगडे आणि यशश्रीबद्दल अपूर्वा म्हणते, "अमृता प्रचंड चिडली आहे, हे लक्षात ठेवा. यशश्री पण... दोघीपण विमझिकल आहेत." त्यामुळे आजच्या टास्क मध्ये के होणार, कोण कोणाला भारी पडणार आणि कोण कॅप्टन होणार ही पाहणे गमतीशीर आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.