Bigg Boss Marathi 4: सध्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात दोन टीम पडलेल्या आहेत. या दोन्ही ग्रुपमध्ये प्रचंड चुरस आहे. जेवढी खेळाची चुरस आहेत तेवढीच वैयक्तिक ठसण आणि राग देखील आहे. त्यांचे विचार परस्पर विरोधी असल्याने आजवर या दोन्ही ग्रुप मध्ये अनेक राडे झाले आहेत. पण आता या दोन ग्रुपमधून फुट पडून तिसराच ग्रुप तयार होणार आहे. आजच्या भागात त्याची चर्चा होताना दिसणार आहे.
बिग बॉस मराठी'चा (bigg boss marathi 4) खेळ म्हणजे टास्क, वाद, भांडण आणि राडे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला सुरुवात होऊन महिना उलटला आहे. त्यामुळे आता खरी मजा घेऊ लागली आहे. कोण आपल्यावर गेम करतंय, कोण मनापासून साथ देतय याची प्रचिती स्पर्धकांना येऊ लागली आहे. आता एकमेकांना मित्र - मैत्रिणी म्हणवणाऱ्या सदस्यांमध्येच फूट पडताना दिसणार आहे. आज मोठी खेळी बिग बॉसच्या घरात होणार आहे.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज यशश्री, रोहित आणि रुचिरा नवा ग्रुप तयार व्हावा यावर चर्चा करताना दिसणार आहेत... यशश्रीचे म्हणणे आहे, 'मला एक कळत नाहीये जेव्हा सॅम आली होती तुमच्याकडे प्रोपोसल घेऊन कि आपण एक वेगळा ग्रुप तयार करूयात… पण त्याच्या आधीपासून माझ्या डोक्यात होतं ते. मी जेव्हा या ग्रुपमध्ये गेले होते... तेजू, अमृता, तू, मी आणि रोहित असा एक वेगळा ग्रुप असावा त्यात सॅम नव्हती कुठेही.'
पुढे ती म्हणते, 'सॅम जरी म्हणत असली ती वैयक्तिक खेळते तरी तिचा कल त्या ग्रुपकडे खूप जास्त आहे आणि ते तिला कधीपण परत खेचून आणू शकतात हे मी पाहिलं आहे. मला असं वाटतं तुम्हालाही खूप ग्रांटेड घेतलं जातं आणि सगळ्याच बाबतीत कि, जेव्हा हवं तेव्हा आपण त्यांना परत खेचून आणू शकतो. रुचिराचे त्यावर म्हणणे आहे, म्हणजे नॉमिनेट करायला आम्ही पाहिजे पण आमची कॅप्टीन्सी, किंवा कंटेनरशिप गेली तर हे असताना कशी गेली? तिथे त्यांनी ती जपून ठेवली पाहिजे, पण यांना नॉमिनेट करताना आम्ही करू शकतो.' आता रुचिराचा नक्की काय मुद्दा आहे, नक्की कधी नवा ग्रुप होणार हे आजच्या भागात कळेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.