Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

सूरज चव्हाणला सध्या प्रेक्षकांमधून मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. पण खेळ जसजसा पुढे जाईल तशी स्थिती बदलू शकते.
keadar shinde on suraj chavan
keadar shinde on suraj chavan esakal
Updated on

Bigg Boss Marathi Season 5 : बिगबॉस मराठीचा पाचवा सिझन सध्या भलताच लोकप्रिय झाला आहे. प्रत्येकाच्या तोंडात दिवसभरात बिगबॉस या प्रोग्रामचं नाव असतंच असतं. या प्रोग्राममधील जे स्पर्धक आहेत, त्यांच्याबद्दल माध्यमांमध्ये देखील बऱ्याच गोष्टी लिहून येत आहेत. पण जेव्हा बिगबॉसचा शेवटचा फायनलचा एपिसोड असेल तर यामध्ये कोण कोण दिसेल? याबाबत निर्माते-दिग्दर्शक आणि कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

keadar shinde on suraj chavan
Bigg Boss Marathi 5 : वर्षा कि सूरज व्होटिंग ट्रेंड्समध्ये कोण आघाडीवर आणि कोणाला घरातून काढण्याची प्रेक्षकांनी केली तयारी ?

केदार शिंदे यांनी बिग बॉसचा शो नेमका काय आहे? तिथं आपली टीम कशी काम करते याबाबत 'कॅचअप' या मराठी पॉडकास्टमध्ये बोलताना सविस्तरपणे सांगितलं. यावेळी या पॉडकास्टचे होस्ट अमोल परचुरे यांनी त्यांना शेवटच्या पाचमध्ये कोण असेल, असं तुम्हाला वाटतं? हा प्रश्न केला तेव्हा केदार शिंदे यांनी आपलं मत मांडलं.

keadar shinde on suraj chavan
Bigg Boss Marathi 5 : अंकिताने प्रयत्न करूनही सुरजला ओळखता येईना प्राणी, सदस्यांना हसू अनावर

शिंदे म्हणाले, "या प्रश्नाच उत्तर अत्यंत कठीण आहे. कारण आता गेम ज्या पद्धतीनं फिरतोय त्यावर एक्साईटमेंट आतमध्ये पण आणि बाहेर ही आहे. या शोमध्ये असलेले प्रत्येक स्पर्धक इथं जिंकायलाच आलेला आहे, तो काही शस्त्र टाकून घरी येणार नाही, तो लढेल. पण कोण आत्ता येईल हे मला माहिती नाही. पण जो जनतेचा रेटा तुलाही दिसतोय आणि मलाही दिसतोय त्यानुसार सूरज तर येईल.

सूरज तर मला दिसतोय शेवटच्या पाचमध्ये कारण त्याला जे काही मतदान होत आहे, ते तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. संपूर्ण इंटरनेटलाच हे माहिती आहे. त्यामुळं शेवटच्या पाचमध्ये सूरज असायला पाहिजे," असं मत केदार शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.