Bigg Boss Marathi: दाद्यानं दगा केला! किरण मानेमुळे विकास दुखवला, नात्यात फूट!

भाऊ भाऊ म्हणत पाठीत खंजीर, आता येणार खरी मजा..
Bigg Boss Marathi S 4 kiran mane and vikas dispute
Bigg Boss Marathi S 4 kiran mane and vikas dispute sakal

बिग बॉस मराठी'चा (bigg boss marathi 4) खेळ म्हणजे टास्क, वाद, भांडण आणि राडे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला सुरुवात होऊन 14 दिवस उलटले असून आता घरी मजा घेऊ लागली आहे. कोण आपल्यावर गेम करतंय, कोण मनापासून साथ देतय याची प्रचिती स्पर्धकांना येऊ लागली आहे. आता एकमेकांना मित्र - मैत्रिणी म्हणवणाऱ्या सदस्यांमध्येच वाद होताना दिसत आहे. इथे कुणीही आपलं नसतं, या मांजरेकरांच्या वाक्याची प्रचिती येऊ लागली आहे. (Bigg Boss Marathi S 4 kiran mane and vikas dispute )

'बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वापासूनच आपण पाहत आलोय की किरण माने आणि विकास यांची जोडी जमली आहे. त्यांना बऱ्याचदा त्यावरून ऐकवलंही गेलं आहे. किरण माने यांनी पहिल्यापासून विकासला आपलंसं केलय. एवढंच नाही तर घरच्यांनी तुला कसं वेगळं केलंय याचीही ते विकासला जाणीव करून देत असतात. यावरूनच यंदाच्या चावडीत किरण माने यांना सर्व सदस्यांनी सुनावले. त्याचेच परिणाम म्हणून कि काय आता किरण माने विकास ची साथ सोडणार आहेत. दोघांमध्ये येत्या काळात खडाजंगी होणार का, हे लवकरच कळेल.

किरण माने आणि विकास हे दोघे बिग बॉस मराठीच्या घरात अगदी सुरुवातीपासून एकत्र आहेत. कितीही कोणी त्यांच्याविरोधात बोले, विकासला किरण माने यांच्याबाबत सांगितले तरी देखील यांची मैत्री तुटली नाही. विकास किरणला प्रेमाने दाद्या बोलतो, त्याला म्हणजेच मोठा भाऊ मानतो. एकमेकांच्या साथीने त्यांनी आजवरचा प्रवास पूर्ण केला. पण, आज मात्र त्यांची मैत्री तुटणार का ? असं वाटतं आहे. विकासने खडसावुन सांगितले आता मी तुमच्याशी बोलणार नाही. तुम्ही तिथे माझ्यासाठी उभे पण नाही राहिलात. किरण माने यांचे म्हणणे आहे आता मला एकटं व्हायचे आहे. किरण माने यांच्या या म्हणण्यावर विकास दुखावला गेला आहे. 'दादा मला वाईट वाटतं आहे तिथे कोण नव्हतं तुम्ही होते' असं विकास म्हणतो. त्यावर किरण म्हणाले, राग काढ माझ्यावर पण स्वतःला त्रास करून नको घेऊस.' त्यामुळे आजवर एकत्र असलेली ही जोडी वेगळी होणार का, हे आजच्या भागात कळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com