Bigg Boss OTT 2 Jiya Shankar: वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस ओटीटी 2' सध्या रंगात आला आहे. या शोमध्ये आता स्पर्धक एकमेकांसोबत वाद घालतांना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात युट्युबर एल्विश यादवची एन्ट्री झाल्यापासून घरातलं वातावरण बदललं आहे.
त्याचं घरात येणं काही सदस्यांना आवडलं आहे तर काहींना खटकलं आहे. सध्या घरात जिया शंकर, अविनाश सचदेव आणि फलक नाझ एका बाजूला आणि एल्विश यादव दुसऱ्या बाजूला असं काहीसं चित्र आहे.
सुरवातीला एल्विशला घरात असिस्टेंट बनवण्यात आलं होतं. तेल्हा घरातल्यांनी त्याच्याकडून खुप काम करुन घेतली मात्र आता बिग बॉसनं गेम बदलला आणि त्याला तानाशाह बनवलं. तानाशाह बनताच एल्विशने त्याचे गुण दाखवले. तेव्हा घरातील या तिन्ही स्पर्धकांनी त्याच्या आदेशाचं पालन करण्याचं नकारलं. मात्र रोष काढण्याच्या नादात जियानं हद्दचं पार केली .
बिग बॉसने हुकूमशाह बनवल्यामुळे घरातील सत्ता मिळताच एल्विशने घरच्यांना काम दिली. घरातल्यांना काम सांगतांना त्याने जिया शंकरकडे एक ग्लास पाणी मागितले.
जियाने त्याला पाणी दिले मात्र त्यात तिनं हॅण्डवॉश मिसळला. साबणाचं पाणी तिने त्याला पाजलं. जेव्हा त्याने ते पाणी पिलं तेव्हा त्याला त्याची चव विचित्र वाटली. त्याने जेव्हा मनिषाला हे सांगितलं तेव्हा तिने त्याचा वास घेतला आणि त्यात साबण मिसळ्याचे सांगतिले.
एल्विश जियाला चांगलचं फटकारलं. पाणी पाजणं हे पुण्याचं काम आहे. मात्र त्यावेळी जियाला तिने केलेल्या कृतीचा काहीच पश्चात्ताप नव्हता. तिने या कृतीला प्रँक म्हटलं. ती याबबात फलक आणि अविनाशसोबत बोलतांना दिसली. मात्र घरातील बाकी सदस्यांनीही तिला याकृतीबद्दल खुप सुनावलं. तिने हे करायला नको होत असं देखील पुजा तिला बोलली.
तर सोशल मडियावर देखील वातावरण खुप तापलं. नेटकऱ्यांनी जियाला खुप ट्रोल केलं आहे. जेव्हा पासून सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे तेव्हापासून शेम ऑन जिया (#ShameOnJiya) हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे.
ही गोष्ट आकांक्षा पुरीच्या कानावर पडताच तिने आश्चर्य व्यक्त केले. आरजे सिद्धार्थ कन्ननच्या पोस्ट पाहिल्यानंतर धक्का बसला. तिने लिहिले, "खरंच??? तुम्ही खरे बोलत आहात का? मी अजून एपिसोड पाहिलेला नाही, पण लाजिरवाणी गोष्ट आहे. हे करायला नको होते. हा वेडेपणा आहे.
आता नेटकरींनी देखील तिच्या या कृतीमुळं बिग बॉसनं तिला शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. आता 'वीकेंड का वार' मध्ये यावर निर्णय घेतला जाईल.
एल्विश यादव, आशिका भाटिया, अविनाश सचदेव, फलक नाझ, जैद हदीद आणि जिया शंकर यांना या आठवड्यात नॉमिनेट करण्यात आलं आहे. त्यामुळे या आठवड्यात घरातुन कोण बाहेर जाणार हे लवकरच कळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.