Pooja Bhatt : 'पुरुषांनी प्यायलेलं चालतं, बायकांनी का नाही? सगळे नियम बायकांसाठीच का?'

'मला दारुडी म्हणता, पुरुषांनी प्यायलं तर चालतं, मग....पुजा भट्टचा थेट सवाल करत अभिनेत्रीनं सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे.
Bigg Boss ott 2 Pooja Bhatt Quit Drinking Salman khan
Bigg Boss ott 2 Pooja Bhatt Quit Drinking Salman khan esakal
Updated on

Pooja Bhatt revealed how she quit drinking at 44 bigg boss : Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटीच्या सीझन २ ला आता सुरुवात झाली आहे. त्याचा प्रीमिअर व्हायरल होतो आहे. गेल्या काही वर्षांपासून ओटीटी बिग बॉसला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर या वेगळ्या शो चे प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे.

यंदाच्या बिग बॉस ओटीटी सीझन २ मध्ये पुजा भट्ट, अभिषेक मल्हान, पलक पुरस्वानी, अविनाश सचदेव, मनीषा रानी, जिया शंकर, जद हदीद, फलक नाझ, सायरस ब्रोचा, बेबिका धुर्वे, आकांक्षा पुरी आणि आलिया सिद्धिकी स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा शो होस्ट करतो आहे. बिग बॉसचेही सुत्रसंचालन सलमाननं केले होते. त्यानं यानिमित्तानं बिग बॉस ओटीटी २ मध्ये डेब्यु केलं आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या दिवशी काही स्पर्धकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या व्हायरल झाल्या आहेत. यासगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री पुजा भट्टनं तिच्या वादळी आयुष्याबद्दल काही धक्कादायक खुलासे देखील केले आहेत. वयाच्या ४४ व्या वर्षी आपल्याला लागलेले दारुचे व्यसन कसे सोडवले याविषयी सांगितले आहे. पुजा भट्ट ही पुर्णपणे दारुच्या आहारी गेली होती. यावेळी पुजानं सायरस ब्रोचाशी बातचीत सलडकरताना काही गोष्टींविषयक धक्कादायक खुलासा केला आहे.

पुजानं म्हटलं की, समाजात काय फक्त पुरुषांनाच दारु पिण्याचे लायसन्स मिळते का, पुरुषाला अनेक गोष्टींबाबत सुट मिळते. त्याला उघडपणे सगळ्या नशा करण्यासाठी परवानगी असते. तसे जर एखाद्या स्त्रीनं केले तर मात्र त्याच्यावर सडकून टीकाही केली जाते. बायका उघडपणे दारु का पिऊ शकत नाही. जसे पुरुष पितात. त्यांना कसेही वागायला परवानगी, त्यांनी कुठेही, कधीही दारु प्यायली तरी काही प्रॉब्लेम नाही. पण महिला तसं वागू शकत नाही.

स्त्री आणि पुरुषांमध्ये असा भेदभाव का करता, हा माझा मुख्य प्रश्न आहे. मी जेव्हा पूर्णपणे दारुच्या आहारी गेले होते तेव्हा मला एकच प्रश्न पडला होता. जर मला प्यायला एवढी भीती बाळगावी लागते तर ती सोडण्यासाठी त्यासाठी किती जणांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. मी वयाच्या ४४ व्या वर्षी दारु सोडली. असेही पुजानं यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.