Bigg Boss OTT 2: तुझा नवरा, सासू अन् कुटूंबाशी आम्हाला काही घेणं देणं नाही', नवाजच्या बायकोला सलमानने झापलं!

Bigg Boss OTT 2
Bigg Boss OTT 2Esakal
Updated on

Bigg Boss OTT 2 Weekend Ka Vaar: बिग बॉस OTT चा दुसरा सिझन सुरु झाला आहे. आता या शो ला साठी एक आठवडा पूर्ण झाला आहे. पहिल्या आठवड्यात या शोमध्ये वाद अन् भांडण प्रेक्षकांनी पाहिली. आठवडाभर स्पर्धक बिग बॉसच्या घरता धुमाकूळ घालतात आणि त्यानंतर आठवड्याच्या शेवटी बॉस म्हणजे सलमान खान सगळ्याचा क्लास घेतो.

शोचा पहिला वीकेंड का वार शनिवारी दाखवण्यात आला. जो सलमान खान याने होस्ट केला. पहिल्याच वीकेंड का वारमध्ये सलमान फुल फायरल मोडमध्ये दिसला. त्याने घरातील सगळ्या स्पर्धकांना चांगलच फटकारलं.

Bigg Boss OTT 2
Adipurush Box Office Collection Day 8 : आदिपुरुष The End! निर्मातेही निघाले वनवासात...

सलमानने अभिषेकचे नाव घेत स्पर्धकांचा क्लास घ्यायला सुरुवात केली. सलमान अभिषेकला सल्ला देतो की, त्याने घरात मस्त एन्ट्री केली आहे, पण आता तो कूठेतरी भरकटत आहे. त्यानंतर सलमानने आकांक्षा पुरीलाही झापलं. त्यानंतर सलमानने बेबिका आणि पुजा भट्टलाही चांगलच सुनावलं.

घरातील इतर स्पर्धकांची शाळा भरवल्यानंतर सलमान आलियाकडे वळाला.

जेव्हा सलमान आकांक्षाला तिच्या बबिकाच्या भांडणाबद्दल बोलतो तेव्हा ती आता फक्त आलियाशी बोलते असे सांगून स्वतःचा बचाव करते. आलियाशी वैयक्तिक आयुष्य आणि सुट्टीबद्दल बोलते असं बोलताच सलमान तिल थांबवतो आणि घरात तुम्ही वैयक्तिक गोष्टी का करताय? असा सवाल करतो.

आलियाच्या वैयक्तिक आयुष्यात आम्हाला कुणालाच काहीच रस असं म्हणत सलमान आलिया कडे वळतो आणि तिला फटकारतो. तिने तिचे सासू सुनेचे नाटक घरीच ठेवावं आणि बिग बॉसच्या घरात त्याची चर्चा करू नये. असा सल्लाही सलमान तिला देतो.

आलिया नीट ऐक, आम्हाला तुझ्या वैयक्तिक आयुष्यात कसलाच रस नाही, तुझा नवऱ्याचे, सासूचे आणि इतर नातेवाईकांचे काय झाले हे जाणून घेण्यात आम्हाला काहीच आवड नाही.

'जर तुम्हाला वाटत असेल की या शोमध्ये तूला वैयक्तिक आयुष्यामुळे प्रसिद्धी मिळेल तर ते चुकीच आगे . तू तुझी आवृत्ती दाखव, जेणेकरून लोक तुम्हाला पाहू आणि ऐकू शकतील. मी तुम्हाला स्पष्ट करतो की असे पुन्हा होऊ नये.' सलमाने फटकारल्यानंतर आलियाही स्पष्टीकरण देत म्हणते की तिने फक्त अभिषेकला याबद्दल सांगितले.

Bigg Boss OTT 2
Sara Ali Khan Khajrana Ganesh Mandir: मंदिरात सर्वसामान्यांना नो इंट्री सेलिब्रेटींसाठी पायघड्या असं का?

आलियाने घरात एंट्री केली तेव्हाही तिने प्रोमोमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगतिलं होत. त्यानंतर ती पहिल्या एपिसोडपासून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सतत बोलताना दिसते. आलियाने नवाजुद्दीनसोबतच्या वादाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्यामुळे आता सलमानने तिला याबद्दल पुढे बोलू नये असं स्पष्ट भाषेत समजावलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.