Bigg Boss OTT: सर्वात वादग्रस्त 'मुस्कान जट्टाना' आहे कोण?

मनोरंजन क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध असणारा रियॅलिटी शो म्हणून बिग बॉसचे bigg boss ott नाव घेता येईल.
musakan jattana
musakan jattana
Updated on

मुंबई - मनोरंजन क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध असणारा रियॅलिटी शो म्हणून बिग बॉसचे bigg boss ott नाव घेता येईल. गेल्या काही वर्षांपासून या शो नं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही करुन प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित कराय़चं हा उद्देश ठेवून निर्माते या शो चं स्क्रिप्टींग करताना दिसतात. वाद आणि वादग्रस्त वक्तव्य यामुळे हा शो नेहमी लोकप्रियतेच्या बाबत वरचढ असल्याचे दिसुन आले आहे. त्यात सहभागी होणारे स्पर्धकही मनोरंजन क्षेत्रातील वादग्रस्त व्यक्तिमत्व असल्याचं दिसुन आलं आहे. सध्याच्या सीझनची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमध्ये एक स्पर्धक अशी आहे जी सर्वात वादग्रस्त असल्याची चर्चा आहे.

यावेळी बिग बॉस हा शो ओटीटीवरुन सहा आठवड़े अगोदरच प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ओटीटीवरुन प्रदर्शित होणाऱ्या शो चे होस्टींग हे प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर karan johar हा करणार आहे. काल जे स्पर्धक सहभागी होणार आहे त्यांची ग्रँड इंट्री झाल्याचे दिसून आले. स्पर्धकांची नावं जाहीर करण्यात आली आहे. त्यात एक नावं असं आहे की जे सर्वात वादग्रस्त असल्याची चर्चा सोशल मीडियावर social media आहे. ते नाव म्हणजे मुस्कान जट्टाना muskan jattana हिचं. यापूर्वी तिचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे दिसून आले होते.

मुस्कान ही कोण आहे तर, ती मोहाली आणि चंदीगढ शहरांशी संबंधित आहे. तिचं शिक्षण हे ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये झाले. 20 वर्षीय मुस्कान सोशल मीडियावर सर्वात प्रसिद्ध आहे. ती एक ऑस्ट्रेलियन आणि पंजाबी इंन्फ्ल्युएसर आहे. इंस्टावर तिचे पावणे दोन लाख फॉलोअर्स आहेत. यावरुन तिची प्रसिद्धी कळून येईल. तिनं आपल्या इंस्टा बायोमध्ये लिहिलं आहे की, ‘अभी तो और जलील होना है हमें।‘ मुस्कान ही ऑस्ट्रेलियन दक्षिण आशियाई केंद्राची ब्रँण्ड अँम्बेसिडर आहे. तिचं म्हणणं आहे की, तिनं युवक आणि महिलांसाठी काम सुरु केलं आहे. ती लैंगिक समानतेवर सोशल मीडियावर जागरुकतेचे काम करताना दिसते.

musakan jattana
Video; फुटबॉलच्या मैदानात अर्जुन आणि रणवीरचा अजब 'दोस्ताना'
musakan jattana
शमिता शेट्टीने सांगितलं 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्यामागचं खरं कारण

मुस्कान वादाच्या भोवऱ्यात सापडण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे तिनं काही दिवसांपूर्वी लाईव्ह केले होते. त्यावेळी तिनं ते केलेलं लाईव्ह हे न्युड होतं. त्यामुळे ती वादात अडकली होती. आता ती बिग बॉसच्या मंचावर दिसणार आहे. त्यामुळे यंदाचा बिग बॉसचा सीझन अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.