मुंबई - लोकप्रिय रियॅलिटी शो बिग बॉसच्या 15 (Bigg Boss 15) व्या सीझनमधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरातील अपडेट्समुळे चाहत्यांची उत्सुकता कमालीची वाढलेली दिसुन आली आहे. आता शो मधील संभाव्य स्पर्धकांची नावेही फायनल झाली आहेत. या स्पर्धेतील एक स्पर्धक अफसाना खान (Afsana Khan) चर्चेत आली आहे. त्याचे कारण ऐकल्यास चाहत्यांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. मीडिया रिपोर्टसनं दिलेल्या माहितीनुसार, बीबी हाऊसमध्ये इंट्री करण्यापूर्वी तिला पॅनिक अटॅक आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्या ती शो बाहेर पडली असून पंजाबला परतली आहे.
अफसाना खान ही एक पंजाबी गायिका आहे. ती आता सलमान खानच्या त्या बीबी हाऊसची स्पर्धक होणार होती. स्पॉटबॉयनं दिलेल्या माहितीनुसार, ती क्वॉरनटाईनच्या दरम्यान एका हॉटेलमध्ये थांबली होती. मात्र त्या दरम्यान तिला अचानक पॅनिक अॅटक आला. आणि तिची प्रकृती चिंताजनक झाली. यानंतर तिला तातडीनं वैदयकीय मदतही पुरवण्यात आली आहे. त्यामुळे आता ती बिग बॉसच्या 15 व्या सीझनची स्पर्धक होणार नसल्याची बातमी समोर आली आहे. यासगळ्या प्रकरणाबाबत अफसानानं इंस्टावर एक स्टोरी शेयर केली आहे. त्यात तिनं माहिती दिली आहे. चाहत्यांना आपल्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आवाहन केलं आहे.
तिनं लिहिलं आहे की, मी आता ठीक नाही. खूप आजारी आहे. बीबीच्या 15 व्या सीझनची नावं फायनल झाली आहेत. मात्र त्या दरम्यान झालेल्या प्रकारानं मी भांबावून गेली आहे. बीबीच्या बाबत सांगायचं झाल्यास, अफसाना खानसहित, अलावा तेजस्वी प्रकाश, करण चंद्रा, सिंबा नागरपाल, प्रतीक सहजपाल, शमिता शेट्टी, निशांत भट्ट, डोनल भ्रिष्ट आणि उमर रियाज यांची नावे घोषित करण्यात आली होती. यातील अफसानाला आलेल्या अटॅकनं तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.