Bigg Boss 16 : मिस इंडियाची नौटंकी; किचनचे काम करण्यास नकार, गरिबीचे नाटक

मान्या सिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
Manya Singh News
Manya Singh NewsManya Singh News
Updated on

Manya Singh News मिस इंडिया २०२०ची रनरअप मान्या सिंगने बिग बॉस १६ मध्ये धमाकेदार एंट्री केली. शोच्या ग्रँड प्रीमियरमध्ये मन्या म्हणाली की, शोमध्ये खास ओळख निर्माण करण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी आली आहे. जेणेकरून तिला भरपूर पैसे मिळतील. पण आतापर्यंत मान्या या शोमध्ये फार काही करू शकलेली नाही. मग कशासाठी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे?

मिस इंडिया रनरअप मान्या सिंगने प्रिमिअरच्या दिवशी सलमान खानसोबतच्या संवादात तिचे कठीण दिवस आठवले. अनेकवेळा शोमध्येही मान्या तिच्या गरिबीबद्दल बोलताना दिसत आहे. अशा परिस्थितीत काही लोक मान्या हिला ट्रोल करीत आहेत. पुढे जाण्यासाठी ती गरिबीचे कार्ड खेळत आहे, असे म्हणत आहे.

आता मान्या सिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मान्या सुंबुल तौकीरला सांगत आहे की तिच्या घरात टीव्ही नसल्यामुळे वडील शो पाहू शकत नाही. मान्याच्या म्हणण्यावर सुंबुल म्हणते की, ते फोनमध्ये पाहू शकतात. यावर मान्या म्हणाली, ते गावात राहतात. त्यामुळे फोनवरही पाहू शकत नाही.

शो प्रिमिअरच्या दिवशी मान्याने स्वतः सांगितले होते की, वडील मुंबईत ऑटो चालवतात. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना तिचे बोलणे समजणे थोडे कठीण होत आहे. याशिवाय मंगळवारच्या एपिसोडमध्ये मान्या सिंग किचन ड्युटीवर टीना दत्तासोबत भांडताना दिसली. शोच्या पहिल्या दिवशी मान्या दिसली नव्हती.

काही लोकांनी नॉमिनेशनमध्ये मान्याचे नाव घेतले तेव्हा ती किचनच्या ड्युटीवरून वाद घालताना दिसली. तिने स्वयंपाकघर साफ करण्यास नकार दिला. अशा स्थितीत अनेक युजर्सचे असेही म्हणणे आहे की, मान्याने जाणूनबुजून काम न करण्याचा मुद्दा मांडला. जेणेकरून ती दिसावी.

सोशल मीडियावर काही लोक मान्या सिंगला स्वयंपाकघरातील ड्युटीवर भांडण केल्याबद्दल ट्रोल करीत आहेत, तर अनेक लोक तिच्या समर्थनासाठी पुढे येत आहेत. मान्याला ट्रोल करत एकाने लिहिले, सर्वत्र गरिबी कार्ड. ती स्वत:साठी कपडे खरेदी करू शकते, मेकअप करू शकते, पण वडिलांना फोन किंवा टीव्ही देऊ शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.