Vijay Vikram Singh : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये आपल्या आवाजानं वेगळी ओळख तयार करणाऱ्यां कलाकारांमध्ये विजय विक्रम सिंहचे नाव घ्यावे लागेल. मोठ्या कष्टानं आणि संघर्षातून त्यानं त्याची वेगळी वाट तयार केली आहे. मात्र एक दोन नव्हे तर गेल्या सात वर्षांपासून नैराश्यामध्ये असणाऱ्या विजयला हे सगळं कसं शक्य झालं याविषयी त्यानं एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.
व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट विजयला आता वेगळ्या ओळखीची काही गरज नाही. ज्यांनी बिग बॉस पाहिलं आहे त्यातील बिग बॉसचा आवाज ऐकला आहे त्यांना विजय कोण आहे हे माहिती आहे. विजय यापूर्वी मास्टरशेफ इंडिया आणि द कपिल शर्मा शोमध्ये देखील सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. त्याचा सोशल मीडियावर चाहतावर्ग मोठा आहे. त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आता भलेही विजय विक्रमची यशोगाथा सगळीकडे व्हायरल होत असली त्याच्या प्रवासाविषयी फार कमी जणांना माहिती आहे.
Also Read - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
लहान वयातच विजयला दारुचे व्यसन लागले होते. त्याचे ते व्यसन बऱ्याच वर्षे टिकले. त्यातून त्याला बाहेर येण्यासाठी संघर्ष करावा लागला. व्यसनांच्या गर्तेत अडकलेल्या विजयसाठी हा काळ मोठा खडतर होता. तो ज्याठिकाणी नोकरीच्या शोधात असे तिथे त्याला सतत अपयशाचा सामना करावा लागायचा. त्यामुळे तो नैराश्यात सापडला होता. विजयनं मिड डे ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या स्टोरीविषयी सांगितले आहे.
विजयनं सांगितलं की, त्याला कधीही व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट व्हायचं नव्हतं. तो जेव्हा २९ वर्षांचा होता तेव्हा त्याला कुणीतरी त्याचा आवाज चांगला असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यानं त्या गोष्टीला गांभीर्यानं घेतलं आणि त्याचा प्रवास सुरु झाला. विजयच्या कुटूंबाला त्याविषयी काहीही माहिती नव्हते. विजय जेव्हा एका स्टुडिओमध्ये गेला तेव्हा त्याला त्याच्यातील गुणवत्तेविषयी कळलं. आणि मग तो या क्षेत्रात आला. व्हॉईस ओव्हर याच क्षेत्रात पूर्णवेळ काम करायचे असा त्यानं निर्णय घेतल्याचे दिसून आले.
विजय म्हणतो, मी कधीही हार मानली नाही.माझ्या अवतीभोवती जे अपयशी होते त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. मी नेहमीच माझ्या मित्रांना लढण्यासाठी प्रोत्साहित करतो. जेव्हा मला सुरुवातीच्या काळात अपयशाला सामोरं जावं लागलं तेव्हा मी पूर्णपणे नैराश्यात गेलो होतो. दारुच्या आहारी गेलो होतो. विजयनं बिग बॉसच्या चौथ्या सीझनसाठी आवाज दिला होता. त्यानंतर तो प्रचंड यशस्वी झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.