Pallavi Prashanth Arrested: 'बिग बॉस' विजेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या! जाणून घ्या काय आहे प्रकरण

'बिग बॉस तेलुगू 7' ची विजेती पल्लवी प्रशांतला अटक करण्यात आली आहे.
Pallavi Prashanth Arrested:
Pallavi Prashanth Arrested:Esakal
Updated on

Pallavi Prashanth Arrested: तेलगू टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेलुगू 'बिग बॉस 7' चा विजेती पल्लवी प्रशांतला पोलिसांनी अटक केली आहे. या बातमीनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पल्लवी प्रशांतविरुद्ध जुबली हिल्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पल्लवी प्रशांत आणि त्याचा लहान भाऊ मनोहरलाअटक केली आहे.

पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध बेकायदेशीर गर्दी जमवणे आणि वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ANI नुसार, पल्लवी प्रशांतच्या विरोधात कलम 147, 148, 290, 353, 427 r/w 149 IPC आणि कलम 3 PDPP कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pallavi Prashanth Arrested:
Shreyas Talpade: "मी त्यांच्या अस्तित्वावर कधी प्रश्नचिन्ह..." 6 दिवसांनी श्रेयसला मिळाला डिस्चार्ज! पत्नी दीप्तीनं सांगितली 'त्या' दिवसाची आपबिती

पल्लवी प्रशांतने नुकतीच 'बिग बॉस 7' ची ट्रॉफी जिंकली आहे. या शोच्या फायनलनंतर त्याच्या चाहत्यांनी शोचा उपविजेता अमरदीप चौधरीच्या कारची काच फोडली. त्याच्यासोबत चुकिचे वर्तन करण्यात आले, त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. आता पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.

पोलिसांनी मुख्य आरोपी प्रशांत (A1) आणि त्याचा भाऊ मनोहर (A2) यासह अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. आता पोलिस अधिकारी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व लोकांची ओळख पटवत आहेत.

Pallavi Prashanth Arrested:
Dunki Twitter Review: डंके की चोटपर 'डंकी' चालणार की नाही? नेटकऱ्यांनी काय सांगितलं?

कोण आहे पल्लवी प्रशांत

पल्लवी प्रशांत हा एक YouTuber आहे. तो तेलंगणातील एका छोट्या गावातील रहिवासी आहेत. पल्लवी प्रशांत हा एक शेतकरी आहे. त्याने प्रेक्षकांची मने जिंकत बिग बॉसच्या सातव्या सिझनची ट्रॉफी आणि 35 लाख रुपयांचे बक्षीस आपल्या नावे केले.

आता पोलीसांनी त्याला अटक केल्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांचा शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()