Who is Aditi Arya: देशातील दिग्गज बँकर आणि अब्जाधीश उदय कोटक यांचा मुलगा जय कोटक याने मंगळवारी माजी मिस इंडिया आदिती आर्यासोबत लग्नगाठ बांधली. जय आणि आदितीने मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये लग्न झाले. राजस्थानमधील उदयपूर येथे त्यांच्या लग्नाचे इतर विधी आणि समारंभ पार पडले.
जय कोटकने या वर्षाच्या सुरुवातीला अदितीसोबतचे त्याचे नाते सार्वजनिक केले होते. जयने अदितीशी एंगेजमेंट केल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. सध्या जय आणि आदितीच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता आदिती आहे तर कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. चला तरी मग आदितीबद्दल जाणुन घेऊया.
आदिती आर्याचा जन्म 18 सप्टेंबर 1993 रोजी झाला. आदिती मूळची चंदिगडची. तिने सेक्रेड हार्ट सीनियर सेकंडरी स्कूलमधून प्राथमिक आणि एमिटी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर आदिती गुरुग्रामला गेली. तिने दिल्ली विद्यापीठ शहीद सुखदेव कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने Ernst and Young येथे संशोधक म्हणून काम केले.
त्यानंतर 2015 मध्ये तिने फेमिना मिस इंडियाचा मुकुट मिळवला. त्यानंतर आदितीने चीनमध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले.
आदितीने चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिने दिग्दर्शक पुरी जगन्नाध यांच्या 'इस्म' या चित्रपटातून टॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
आदितने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. तिने 2021 मध्ये रिलीज झालेल्या रणवीर सिंग स्टारर '83' चित्रपटातही काम केले.
यासोबत तिने 'तंत्र' या हिंदी वेबसीरिजमध्येही काम केले होते. काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर, आदिती आयव्ही लीग स्कूल, येल विद्यापीठात तिचे एमबीए पूर्ण करण्यासाठी गेली. आदिती ही सोशल मिडियावरही सक्रिय आहे. तिच्या चाहत्यांची संख्याही कमी नाही.
सध्या जय आणि आदितीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी नव्या जोडप्याचे कौतुक करत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.