बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने आतापर्यंत प्रत्येक चित्रपटात काहीतरी वेगळी भूमिका करुण प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे. तो स्वतःला प्रेत्येक व्यक्तिरेखेनुसार बदलतो. '3 इडियट्स'मधील कॉलेज मुलाची भूमिका असो किंवा 'दंगल'मधील दोन मुलींच्या कुस्तीपटू बापाची भूमिका असो, आमिर खानने त्याच्या प्रत्येक चित्रपटात काहीतरी नवीन लूक केला आहेत. रील लाइफशी संबंधित आमिरचा प्रत्येक लूक प्रेक्षकांना आवडला आहे, परंतु सध्या या अभिनेत्याचा खऱ्या आयुष्यातील लूक ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.
अमिरचे त्याची एक्स वाईफ किरण रावसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोंमध्ये आमिरला पाहून अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आमिरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो त्याची कंपनी आमिर खान प्रॉडक्शनच्या ऑफिसमध्ये पूजा करताना दिसत आहे. ही फोटो 'लाल सिंह चढ्ढा' चित्रपटाचे दिग्दर्शक अद्वैत चंदनने इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. ज्यामध्ये आमिर कलशाची पूजा करत असल्याचं दिसतय. यानंतर तो आरतीही करतात. काही फोटोंमध्ये त्यांची माजी पत्नी किरण रावही त्यांच्यासोबत या पूजेमध्ये दिसत आहे.आमिर खान ट्रोल झाला होता
किरण रावसोबतच्या ऑफिसमधील पूजेच्या फोटोबरोबरचं लक्ष वेधून घेतले ते म्हणजे आमिरच्या नवा लूक. या फोटोंमध्ये आमिर खानची दाढी, केस आणि मिशा दिसत आहेत. त्याने डोक्यावर टोपी घातली असून गळ्यात स्कार्फ आहे. आमिरच्या या लूकवर अनेक मजेशीर कमेंट्स आल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, त्याने नाव वाचले नाही आणि तो शक्ती कपूरचा फोटो आहे असं वाटलं. तर एकानं लिहिलयं की, आमिर हुबेहुब दक्षिणेतील अभिनेता जगपती बाबूसारखा दिसतो लूक्सशिवाय यावर ट्रोलही झाले होते
हेही वाचा: Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’
लूकशिवाय आमिर खानला आणखी एका गोष्टीसाठी ट्रोल केले जात आहे. एका यूजरने लिहिले की, 'वाह बेटा, तू तुझा धर्म विसरला आहेस.' तर दुसर्याने लिहिलयं की, 'लाल सिंह चड्ढा नंतर समजलं की त्याची पीआर एजन्सी त्याचे इतके फोटो का फिरवत आहे. हिंदूंची किंमत आता कळत आहे. मात्र, अनेक चाहत्यांना आमिरचा नवा लूक आणि त्याची कलशाची पूजा आवडली आहे. यावर अनेक यूजर्सनी आमिरचे कौतुकही केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.