टॉलीवूडच्या प्रभावाबद्दल अभिषेक बच्चन बोलला, बॉलीवूड हे नेहमीच...

टॉलीवूडनं (Tollywood News) गेल्या दोन वर्षांपासून बॉलीवूडला एका बाजुला लोटले आहे.
 Abhishek Bachchan
Abhishek Bachchan esakal
Updated on

Bollywood News: टॉलीवूडनं (Tollywood News) गेल्या दोन वर्षांपासून बॉलीवूडला एका बाजुला लोटले आहे. मग ते बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या बाबत आणि प्रेक्षकांच्या संख्येच्या दृष्टीनं देखील. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या विजयचा द मास्टर, त्यानंतर आलेल्या अल्लु अर्जुनच्या पुष्पानं (Allu Arujun) , यावर्षी राजामौलींच्या आरआरआनं आणि केजीएफ2 ने मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. बॉक्स ऑफिवर (Box Office) तीनशे कोटींहून अधिक रुपयांची कमाई या चित्रपटांनी केली आहे. आरआरआरनं हजार कोटींकडे वाटचाल केली आहे. अशा परिस्थितीत बॉलीवूडचे चित्रपट सपशेल अपयशी ठरले आहेत. त्याच (Entertainment News) त्या कथा, अभिनेते, तेच ते संवाद, तीच ती रटाळ गाणी आणि लोकेशन्स याला कंटाळलेल्या प्रेक्षकांनी टॉलीवूडची वाट धरली आहे.

यासगळ्यात महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चननं एक महत्वाचं विधान केलं आहे. त्यानं केलेलं विधान सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. अभिषेकचा काही दिवसांपूर्वी दसवी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यात त्याच्यासोबत यामी गौतम प्रमुख अभिनेत्री म्हणून दिसली आहे. अभिषेकनं एका मुलाखतीमध्ये एका बॉलीवूडच्या अपयशाविषयी भाष्य केले आहे. पॅन इंडिया अंतर्गत जे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सध्या भारतीय प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन होताना दिसत आहे. असे अभिषेकनं म्हटलं आहे.

 Abhishek Bachchan
Video viral: सुजल जगदाळे उर्फ बुलट कुठं बसलंय बघा! पेपर सोडून आला बैलगाडा शर्यतीत

मी कधीही कोणत्या चित्रपटाला वेगवेगळ्या वर्गामध्ये वर्गीकृत केलं नाही. तो माझा स्वभाव नाही. जो चित्रपट मला आवडला. त्याचं मी मनापासून कौतुक करतो. ज्याचा कंटेट चांगला असेल त्याला प्रेक्षकांकडून दाद मिळतेच. एखाद्या चित्रपटावर टीका होते याचा अर्थ त्याचा कंटेट हा फारसा स्ट्राँग नसल्याचे दिसून येते. त्यामुळे उगाचच प्रेक्षकांवर चिडण्यात काही अर्थ नाही. प्रेक्षकांचे निखळ मनोंरंजन करणारे चित्रपट यशस्वी होते. असे दिसून आले आहे. साऊथमध्ये सुद्धा हिंदी चित्रपटाचे रिमेक तयार होतातच की, आपण सगळ्या एकाच फिल्म इंडस्ट्रीचा भाग आहोत हे विसरता कामा नये. असे अभिषेक बच्चननं सांगितलं.

 Abhishek Bachchan
Photo Viral: मुलासोबत आमिर खान घेतोय आंब्याचा आस्वाद!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.