Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

Amitabh Bachchan
Amitabh BachchanEsakal
Updated on

बॉलीवूडचे दिग्गज महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या व्यक्तिमत्त्व हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. प्रसिद्ध वकील हरीश साळवे न्यायमूर्ती नवीन चावला यांच्यासमोर अमिताभ बच्चन यांची बाजू मांडणार आहेत.

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांची प्रतिमा, व्यक्तिमत्त्व गुणधर्म, आवाज आणि नाव यांचे संरक्षण करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपीठासमोर दिल्ली उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येऊ शकते. बॉलीवूडचे बादशहा अमिताभ बच्चन यांनी याआधीच आपल्या आवाजाच्या वापरण्याबाबत चिंता व्यक्त केली होती.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन यांना मोठा दिलासा देत न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम मनाई आदेश दिला आहे. त्यानुसार अमिताभ बच्चन यांच्या परवानगीशिवाय त्यांचे चित्र आणि आवाज वापरता येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Amitabh Bachchan
KBC 14: 'आयुष्यातील कोणती गोष्ट बदलायला आवडेल'? बिग बीं नी दिलं उत्तर

हिंदी चित्रपटांमध्ये आपला उत्कृष्ट अभिनयान आणि दमदार आवाजाने अनेक हिट सिनेमे राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'उंचाई' या चित्रपटामुळे ते चर्चेत आहेत. त्याचा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्याकडे 'घूमर', 'गणपत', 'द उमेश क्रॉनिकल्स', 'बटरफ्लाय' आणि 'प्रोजेक्ट-के' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. त्याचबरोबर सध्या ते कौन बनेगा करोडपतीच्या 14व्या सीझनचे सूत्रसंचालन करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()