Bollywood News: जॉनी लिव्हर हे नाव कुणाला माहिती नाही असा व्यक्ती शोधून सापडणं अवघड आहे. तीन दशकांहून अधिक काळ या कलाकारानं भारतीय (Bollywood Actor) प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. केवळ बॉलीवूडच नाहीतर टॉलीवूडमध्येही त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. बॉलीवूडमधील मोठमोठ्या अभिनेत्यांसमवेत जॉनी यांनी काम केलं आहे. आपल्या प्रसन्न शैलीतील (Johny Lever) अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. प्रेक्षकांना नेहमीच हसविणाऱ्या जॉनी लिव्हर यांना त्यांच्या खऱ्या आयुष्यात खूप मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागल्याचे दिसून आले आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्याविषयी (Entertainment News) खुलासा केला होता. तो ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.
असं म्हटलं जातं प्रेक्षकांना रडवणे एकवेळ सोपे असते मात्र त्यांना हसवणे फार कठीण. हे काम प्रभावीपणे करणाऱ्या कलावंतांमध्ये जॉनी लिव्हर यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांच्या अभिनयामागे त्यांचा मोठा संघर्ष आहे. जॉनी यांनी आपल्याला फार लहानपणापासून काम करावे लागले असे सांगितले. आपण पुण्यात एकेकाळी सिग्नलला पेन विकण्याचे काम केल्याचे जॉनी यांनी सांगितले. एका मुलाखतीमध्ये जॉनी यांनी आपल्या आयुष्यातील तो प्रसंग सांगितला. ज्यातून ते अभिनेते आणि माणूस म्हणून किती मोठे आहेत हे कळते. जॉनी यांच्या बहिणीचे निधन झाले होते. त्याच दिवशी त्यांना एका कार्यक्रमालाही जायचे होते. त्यांनी त्या कार्यक्रमाचे मानधनही घेतले होते.
जॉनी जेव्हा त्या प्रसंगाविषयी सांगतात तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. बहिणीची मृत्युची वार्ता कळली तेव्हा हादरुन गेलो होतो. घरात खूप माणसे जमली होती. दु:खाचा डोंगर हा आमच्या कुटूंबावरती कोसळला होता. अशावेळी आम्ही सगळे भावंडं शोकसागरात होतो. मात्र तेव्हा मला एका शो साठी बाहेर जायचे होते. त्याला जावचं लागणार होतं. त्याच कारण मी शब्द दिला होता. बॉलीवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जॉनी यांनी आपल्या हदयद्रावक आठवणींविषयी सांगितले आहे. ते म्हणतात, तो माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण प्रसंग होता. मी आजवर एवढे चित्रपट केले. मला त्यात कधीही भीती वाटली नाही. पण त्या प्रसंगाच्या वेळी वाटली होती. अशी आठवणही जॉनी यांनी सांगितली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.