'सत्यनारायण की कथा'वरुन वाद; समीर विद्वांसचा मोठा निर्णय

'सत्यनारायण की कथा' या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिका साकारणार आहे.
Satyanarayan Ki Katha,  Sameer Vidwans
Satyanarayan Ki Katha, Sameer Vidwansfile image
Updated on

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक समीर विद्वांस (Sameer Vidwans) हा 'सत्यनारायण की कथा' या चित्रपटामधून दिग्दर्शकाच्या भूमिकेत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) मुख्य भूमिका साकारणार आहे. कार्तिकसोबत यामध्ये कोणती अभिनेत्री झळकणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. समीरने नुकतीच या चित्रपटाबाबत पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने चित्रपटाचे नाव बदलण्याबाबत सांगितले आहे.(Bollywood actor Kartik Aaryan film Satyanarayan Ki Katha title changed director Sameer Vidwans issues statement)

'सत्यनारायण की कथा' या चित्रपटाच्या नावाबाबत काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील काही लोकांनी निषेध व्यक्त केला होता. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून समीरने या चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. समीरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहीले, 'कोणत्याही चित्रपटाचे नाव हे त्या चित्रपटाच्या क्रिएटिव प्रोसेसच्या वेळी ठरवले जाते. आम्हाला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. आमच्याकडून हे नकळत झाले. त्यामुळे आम्ही 'सत्यनारायण की कथा' या चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाचे निर्माते आणि क्रिएटिव टीम या निर्णयाचे समर्थन करत आहे. आम्ही आमच्या प्रेम कथेसाठी नवे नाव देणार आहोत.धन्यवाद '

चित्रपटाच्या नावामुळे निर्मात्यांचे तोंड काळ करण्याची दिली होती धमकी

चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियावालाने मध्यप्रदेशमधील वेगवेगळ्या ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी 'संस्कृति बचाओ मंच' चे अध्यक्ष चंद्रशेखर तिवारी यांनी साजिदला जर ते मध्यप्रदेशमध्ये आले तर त्यांचे तोंड काळं केले जाईल अशी धमकी दिली होता. त्यांची अशी मागणी आहे की जो पर्यंत त्यांच्यावर FIR नोंदवला जात नाही तोपर्यंत त्यांचा विरोध केला जाईल. तिवारी यांचा आरोप आहे की, बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून हिंदू लोकांच्या भावनेच्या विरोधात चित्रपटांची निर्मिती केली जात आहे.

Satyanarayan Ki Katha,  Sameer Vidwans
'सारेगमप'चे परिक्षक ओव्हर अ‍ॅक्टिंगमुळे ट्रोल; मृण्मयीचं सडेतोड उत्तर

समीर विद्वांस यांने 'धुरळा', 'वायझेड', 'आनंदी गोपाळ', 'डबलसीट', 'क्लासमेट्स', 'लग्न पहावे करून', 'टाइम प्लीज' यांसारख्या दमदार मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन केले आहे.

Satyanarayan Ki Katha,  Sameer Vidwans
'तुमच्या दुटप्पीपणाचं दुःख वाटतं'; ट्रोलर्सला प्रियाने दिलं उत्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.