येरवड्यात संजूबाबा पहाटे दोनला उठून हनुमान मंत्र म्हणायला बसायचा ते थेट...

संजूबाबाच्या या एका सवयीमूळे पोलीसांची सुद्धा झोप उडायची
sanjay datt
sanjay datt sakal
Updated on

बॉलीवूडचा सुपरस्टार संजय दत्त आपल्या फिल्म करियर बरोबरच आपल्या पर्सनल लाईफमुळेही नेहमी चर्चेत असतो. मग ते त्याचे लव्ह अफेअर्स असो, त्याच्या एकेकाळच्या ड्रग्जच्या सवयी असो किंवा बॉम्बस्फोट प्रकरणात त्याचं आलेलं नाव असो. सिनेमात सुपरस्टार पदापर्यंत पोहचलेला संजू बाबा बॉम्बस्फोट प्रकरणात थेट जेल पर्यंत जाऊन पोहचला. तो नायक आहे की खलनायक हे अजूनही अनेक जणांना कळलं नाही पण त्याच्या व्यक्तिमत्वात सर्व छटा आहेत हे नक्की.

फिल्मइंडस्ट्रीच्या लाडक्या संजूबाबाचा असाच एक किस्सा मेहता पब्लिकेशनच्या योजना यादव यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्येशेअर केला.

sanjay datt
राष्ट्रवादी सोबत शपथ घेताना भाजपने हिंदुत्वाचा विचार कुठे ठेवलेला?

योजना यादव एकदा सांगलीला गेल्या असताना त्यांची भावामुळे एका पोलीस अधिकाऱ्याशी ओळख झाली. गप्पा चालू असताना काही वर्षांपूर्वी त्यांची येरवडा जेलमध्ये पोस्टिंग होती हे कळलं. एका प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने योजना यादव देखील येरवडा येथे जाऊन आल्या होत्या. तेव्हा बोलता बोलता सहज म्हणून योजना यादव यांनी त्यांना संजय दत्तचा विषय काढून बघितला कारण संजय दत्त देखील काही वर्षांपूर्वी येरवडा जेलमध्येच बंदी होता. तेव्हा त्या पोलीस अधिकाऱ्याकडून संजय दत्ताच्या अनेक गंमती जंमती किस्से ऐकायला मिळाले.

sanjay datt
जम्मू-काश्मीर: स्फोटकांनी लगडलेला ड्रोन पाडला; सुरक्षा रक्षकांची मोठी कारवाई

ते म्हणाले , "अहो हिरो बिरो बाहेरच्या माणसासाठी. येरावड्यात आत सगळी माणसं सारखीच. संजू बाबाही तसाच होता. तिथं जे जसं आहे ते त्यानं स्वीकारलेल, पण एक होतं, तो आम्हाला त्याला रात्री दोन वाजता उठवायला लावायचा. पक्का हनुमान भक्त. पहाटे दोन वाजता हनुमान मंत्र म्हणायला बसायचा ते थेट सकाळी सहा पर्यंत. त्याच्या पूजेत कधी खंड पडला नाही."

sanjay datt
BSP : रामपूर लोकसभा पोटनिवडणूक बसपा लढवणार नाही; मायावतींचा मोठा निर्णय

संजय दत्त इतका मोठा हनुमान भक्त असेल हे कोणी स्वप्नात देखील पाहिलं नसेल. सिनेमाच्या पडद्यावर, बातम्यांमधून निर्माण झालेली संजय दत्तच्या प्रतिमेपेक्षाही त्याच येरवडमधलं वागणं प्रचंड वेगळं होतं.

विषय निघाला म्हणून योजना यांनी विचारलं, "पण त्याच्या खाण्यापिण्याचं काय?"

पोलीस म्हणाले, "खाण्यापिण्याचही त्याचं काही नव्हतं. पण त्याची एकच निकड होती. तुरुंगातल्या कामाचे महिन्याचे साडे चारशे रुपये प्रत्येक कैद्याला खर्चाला दिले जायचे. कैदी त्यातनं फळं किंवा आणखी काही चांगलं चुंगलं घ्यायचे, पण त्यानं मात्र कधीच फळं किंवा खायचं काही घेतलं नाही. सगळ्या पैश्याच्या सिगरेटी घ्यायचा. सिगरेटी पुरल्या नाहीतर बिड्या पण फुंकायचा. पण तेवढं एकच."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.