Shreyas Talpade Discharged From Hospital: अभिनेता श्रेयस तळपदे हा गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. 14 डिसेंबर रोजी संध्याकाळी श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सहा दिवसांनंतर श्रेयसला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदेने सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. दीप्तीने बुधवारी इंस्टाग्रामवर स्वतःचे आणि श्रेयसचे बरेच फोटो शेयर केले आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांचे आभार मानले आहे.
दीप्तीनो तिच्या पोस्टमध्ये लिहिले- 'माझं आयुष्य, श्रेयस... घरी परतला आहे... तो सुरक्षित आणि निरोगी आहे. मी श्रेयससोबत वाद घालत होते की मी कोणावर विश्वास ठेवू. मात्र आज मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. आणि ते उत्तर आहे देव. आमच्या आयुष्यात ही कठीण घटना घडली त्या संध्याकाळी तो माझ्यासोबत होता. यापुढे मी त्यांच्या अस्तित्वावर कधी प्रश्नचिन्ह उभं करणार नाही.
त्या संध्याकाळी ज्यांनी मला मदत केली त्या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छिते. मी एका व्यक्तीकडे मदत मागितली आणि 10 हात मदतीला पुढे आले. श्रेयस गाडीच्या आत पडलेला होता, पण ती लोकं कोणाला मदत करत आहेत हे कळत नव्हते, तरीही ती लोकं मदतीला धावून आले.
त्या संध्याकाळी ज्यांनीही आम्हाला मदत केली ती लोकं आमच्यासाठी देवाचा अवतार होते. धन्यवाद. मला आशा आहे की माझा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचेल.'
'मी मनापासून तुम्हा सर्व लोकांची आभारी राहीन. मुंबई शहरच असं आहे. ज्याने आम्हाला सांभाळले. आमची काळजी घेतली.'
पुढे दीप्ती म्हणाली, 'मी माझे मित्र, कुटुंब आणि आमच्या मनोरंजन विश्वाचे आभार मानू इच्छिते... हिंदी आणि मराठी प्रत्येकाच्या प्रेमासाठी आणि काळजीबद्दल आभार. त्यातील काही जण सर्व काही सोडून माझ्या पाठीशी उभे राहिले. तुमच्या सर्वांमुळेच मी एकटे नव्हते. माझ्यासोबत खंबीरपणे उभं राहण्यासाठी प्रचंड आभार..
यासोबत दीप्तीने पुढे लिहिले, 'मी बेले व्ह्यू हॉस्पिटलच्या टीमचे आभार मानू इच्छिते, ज्यांनी माझ्या पतीला वाचवलं. सर्व डॉक्टर, बहिणी, भाऊ, मुलं, मावशी, आई, प्रशासन आणि सुरक्षा, तुमच्या कामासाठी कोणतीही रक्कम पुरेशी नाही.'
यासोबतच दीप्तीने श्रेयसबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले. ती लिहिते, 'मी सर्व चाहत्यांचे आभार मानते. श्रेयसच्या सुरक्षिततेसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी माझ्यासोबत प्रार्थना करणाऱ्या अनेकांचे प्रेम, प्रार्थना आणि आशीर्वाद या कठीण काळात आम्हाला मिळाले. धन्यवाद. त्या संध्याकाळी देवाने आम्हाला मदत केली. मी खरोखरच यासाठी नम्र आणि सदैव कृतज्ञ आहे. धन्यवाद.'
सध्या दीप्तीची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी तिच्या पोस्टला कमेंट करत आहे. दीप्तीच्या पोस्टला कमेंट करत चाहते आनंद व्यक्त करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.